महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा चौफेर मंत्रालयीन पाठपुरावा; महत्वाच्या विषयांबाबत घेतल्या विविध भेटी..!

| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सोमवार दि. ५ जुलै व ६ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून बिकट आणि लागू असलेल्या कठोर नियमांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या स्तरावर मंत्रालयीन पाठपुरावा करण्यात आला.!

या पाठपुराव्यासाठी संघटनेचे पदाधिकारी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील, राज्य कोषाध्यक्ष प्रविण बडे तसेच रायगड राज्य समन्वयक राजेश पाटील उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या पाठपुराव्याबाबत संघटनेचे पदाधकारी यांनी सविस्तर अशी माहिती दिली..

१. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण सचिव यांची शासकीय निवासस्थानी भेट :

NPS वरून शिक्षक संवर्गात असलेला रोष आणि संघटना म्हणून त्या प्रक्रियेबाबत वेळोवेळी आपण मांडलेल्या समस्या यांबाबत त्यांची भेट त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी समवेत शिक्षण सचिव वंदना कृष्णा मॅडम, आमदार गाणार साहेब देखील उपस्थित होत्या.

या वेळी शिक्षण मंत्री यांनी आपल्या निवेदनावर शिक्षण सचिव यांना प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. याबाबत शिक्षण आयुक्त, संचालक यांचेकडून या प्रस्तावाबाबत माहिती घेऊन उचित कारवाई करणार असल्याचे शिक्षण सचिव यांनी शालेय शिक्षण मंत्री यांना सांगितले.

तसेच सातव्या वेतन आयोगाचा पहिलाच हप्ता खाजगी शिक्षकांना अजून मिळाला नाही, त्याबाबत देखील तात्काळ निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले, त्याबाबत देखील प्रशासनाने पत्र प्रसिद्ध केले आहेच.!

२. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट :

शिक्षकांच्या बदलीच्या संदर्भाने काही बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच कोविड ड्युटीवर मृत्यू पावलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांना ५० लाख रुपयांचा कोविड विमा निधी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कर्मचारी यांना मिळण्यात येणाऱ्या अडचणी बाबत माहिती अवगत करून दिली.

त्यांनी आपल्या निवेदनावर चर्चा करून योग्य बदल अंतर्भूत करण्याबाबत अधिकाऱ्यांसाठी निवेदनावर नमूद केले.

. वित्त राज्यमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट :

मयत अधिकारी / कर्मचारी कुटुंबीयांना महत्वाचे लाभ मिळण्याच्या दृष्टीने स्थापित समितीची नव्याने बैठक होणे अत्यावश्यक आहे. त्या करिता अध्यक्ष या भूमिकेतून मंत्री शंभू राजे देसाई यांनी बैठक आयोजित करावी यासाठी त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी समितीची आणि जुन्या बैठकीच्या अहवालांची माहिती घेऊन लवकर बैठक लावण्याबाबत त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या. त्या नुसार येत्या २-३ दिवसात त्यांच्या कार्यालयाकडून आपल्याला माहिती दिली जाईल.

४. माजी विधानसभा अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट :

NPS सह जुनी पेन्शन योजना व राज्यासह देशभरात आपल्या प्रश्नांवर सुरू असलेल्या विविध आंदोलनाची माहिती, प्रश्नाची व्याप्ती आदी बाबींवर नाना भाऊ यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सध्या आर्थिक परिस्थिती पाहता याबाबत तात्काळ काही करता येणार नाही. परंतु सर्वोतोपरी पक्ष म्हणून पक्षाची व माझी ताकद या प्रश्नांवर कायम सोबत राहील. लवकरच या बाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल असा शब्द त्यांनी यावेळी दिला. आणि संघटनेच्या मागे झालेल्या आंदोलनाचे कौतुक केले.!

५. राजपत्रित संघटनेचे सल्लागार, अध्यक्ष व NPS संबंधाने काम करणारी टीम यांची भेट :

महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार कुलथे सर, अध्यक्ष देसाई सर या सह त्यांच्या टीम ची आपल्या संघटनेमार्फत भेट घेण्यात आली. जुनी पेन्शन, जुन्या पेन्शनचे लाभ या बाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच एकमेकांसोबत कश्या प्रकारे आपल्याला काम करता येईल, एकमेकांच्या सोबत कसे पुढे जाता येईल आणि हा प्रश्न मार्गी लावता येईल यावर सविस्तर चर्चा झाली.

६. वित्त (लेखा व कोषागारे) प्रधान सचिव गद्रे साहेब व उपसचिव इंद्रजित गोरे साहेब यांची भेट :

NPS बाबत स्थापित समितीची कार्यवाही, त्याबाबत माहितीच्या अधिकारात मिळालेली दिशाभूल करणारी माहिती याबाबत भेट घेऊन चर्चा करण्यात आली. या समितीची बैठक झाल्याशिवाय यावर निर्णय पुढे जाणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आणि समिती inforced मध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.

७. उपसचिव नानल मॅडम यांची भेट :

अ) NPS संबंधाने :

NPS संबंधाने वेळोवेळी आपण उपस्थित केलेले प्रश्न व त्याबाबत सातत्याने आपल्या पाठपुराव्याचा आधार घेऊन नवीन माहिती लेखी स्वरूपात निदर्शनास येत आहे. हिशोब सह विविध बाबतीत प्रशासन कार्य करताना दिसत आहे परंतु अधिकची गुंतागुंत असल्याने त्यात जणू अजून अधिक गुरफटण्याचे काम यातून होत आहे. ” तुमच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही अहवाल मागवत आहोत, योग्य त्या आमच्या अखत्यारीत आहेत त्या बाबतीत सर्व सुधारणा करत आहोत.” असेही त्या म्हंटल्या.

ब ) १० लाखांचे सानुग्रह अनुदान, शिक्षण संचालक कार्यालयाचे दिशाभूल करणारे पत्र आणि परत पाठविलेले प्रस्ताव :

या बाबत २३ जून रोजी भेटी दरम्यान सविस्तर त्यांना कळविले होते आणि विनाकारण जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागातील कर्मचारी यांचे प्रस्ताव परत जात असल्याचे निदर्शनास देखील आणून दिले होते. त्या नुसार त्यांची प्राथमिक चर्चा झाली असून प्रस्ताव थेट शिक्षण विभागास पाठविण्याबाबत लवकरच निर्णय येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

८. ग्रामविकास विभागातील वित्त नियंत्रक व उपसचिव प्रवीण जैन साहेब यांची भेट :

ग्रामविकास विभागाच्या निधीची नाडी हातात असलेले उपसचिव साहेब यांची कोविड काळात मयत झालेल्या जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागातील कर्मचारी यांना मिळणाऱ्या विमा लाभाबाबत भेट घेतली.

महाराष्ट्रातून जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आदी मयत अधिकारी/ कर्मचारी यांचे ५० लाखांच्या विम्यासाठी प्रस्ताव आले आहेत परंतु हे प्रस्ताव शिक्षण विभागातील असल्याने त्यांचा निधी शिक्षण विभागाकडून घ्यावा असे सांगून प्रस्ताव रिजेक्ट होत आहेत.

ग्रामविकास आणि शिक्षण विभाग या दोघांमध्ये समन्वय नसल्याने विनाकारण याचा फटका शिक्षण विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांना भेटत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभातून जे प्रस्ताव आले आहेत ते तसेच पडुन आहेत.

याबाबत उपसचिव साहेब यांनी हे पैसे शिक्षण कडून घ्यावेत, आमचा यांच्याशी संबंध नाही असे सांगत हा महत्वाचा विषय शिक्षण विभागाकडे सोपवला आहे. म्हणजे याबाबत देखील शिक्षण विभागाला काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे.

लवकरच त्या बाबत पुढील पाठपुरावा होईल.

९. बच्चू भाऊ कडू यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. बोरसे सर यांची भेट :

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बोरसे सर यांच्याशी संघटनात्मक बाबतीत चर्चा झाली. तसेच मंत्री महोदय यांच्या समवेत शिक्षण विभागाची बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. त्या बाबत त्यांनी लवकरच बैठक घेऊ असे सांगितले आहे.

१०. ग्रामविकास विभागातील अन्य पाठपुरावा :

अ)
आपल्या संघटनेच्या सदस्यांचे ( शिक्षक सोडून) असलेले सानुग्रह अनुदान प्रस्ताव तपासले असून येत्या आठवड्यात त्याबाबत निधी वितरित होऊन प्राप्त निधीतून क्रमाने ते प्रस्ताव निकाली निघतील.

ब)
बदल्यांबाबत व रत्नागिरी सह कोकणातील जिल्ह्यात आंतर जिल्हा बदल्यांच्या विषयाबाबत संबधित अधिकारी यांच्याशी चर्चा झाली. रत्नागिरी वरून आंतरजिल्हा बदली ने आपल्या मूळ जिल्ह्यात जाण्यासाठी शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून रत्नागिरीचे आणि संघटन विश्वस्त उमेश पाडवी हे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

बदल्यांबाबत काम करणारी NIC पुणे यांचा विभागाशी असलेला करार संपलेला असल्याने जोवर नवीन काही करार होत नाही तोवर बदल्या आणि इतर संबंधित बाबी यांच्याबाबत निश्चित सांगता येणार नसल्याचे समजत आहे.

क)
मेडिकल बिलांच्या सदर्भाने आपल्या सभासदांचे आलेले प्रस्ताव देखील लवकरच निकाली निघणार आहेत तर काही प्रस्ताव सहसंचालक, आरोग्य सेवा यांच्याकडे तपासणीसाठी गेले आहेत. पुढील पाठपुराव्यावेळी त्या बाबत अधिकची माहिती सांगता येईल.

११. नगरविकास विभागात विविध बाबींचा पाठपुरावा :

अ)
मनपा, नपा यांना नक्की कोणती पेन्शन योजना लागू याबाबत नगरविकास विभागाचा प्रस्ताव आणि त्या संबंधातील त्रुटी यांची भेट घेऊन आढावा घेतला.

ब) सातवा वेतन आयोग : भिवंडी

याबाबत आपल्या संघटनेच्या सभासदांच्या मागणीनुसार आपण पाठपुरावा करत आहोत. आपण मागील पाठपुराव्यात सांगितल्याप्रमाणे प्रस्तावातील त्रुटी बाबत पत्र संबंधित मनपा आयुक्त यांना निर्गमित करण्यात आलेले आहे.

क) अनुकंपा बाबत मार्गदर्शन :

आपल्या संघटनेच्या सभासदांचे अनुकंपा बाबत काही प्रस्ताव मार्गदर्शनासाठी नगरविकास विभागात आले आहेत, त्या बाबत पाठपुरावा करून लवकरच त्या गरजूंना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *