| अमरावती | अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील विजय सुखदेव सुने (वय 40 वर्षे) हा शेतकरी सोमवारी (11 जानेवारी) रात्रीपासून बेपत्ता आहे. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी सापडली सोबतच मोबाईल फोनही घरीच असल्याचं समोर आलं आहे. चिठ्ठीत पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख आहे.
माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील, अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याची पत्नीने शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात दिली आहे.
तक्रारीत म्हटलं आहे की, “पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख पतीने चिठ्ठीत केला आहे. माझ्या पतीने जर आत्महत्या केली तर याला ठाणेदार सचिन परदेशी, बिट जमादार तायडे यांना जबाबदार धरुन खुनाचा गुन्हा दाखल करावा.” याशिवाय चांदूरबाजार येथील तहसीलदार धीरज थुल, राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांचे खाजगी सचिव दीपक भोंगाडे यांच्या नावाचा उल्लेखही तक्रारी करण्यात आला आहे.
दरम्यान शिरजगाव कसबा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोन पथकं तातडीने शोधमोहीमेसाठी पाठवण्यात आली आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .