| कोलकाता | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान बुधवारी हल्ला झाला. काही जणांनी ममता बॅनर्जींना धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढण्यात आला आहे. ‘ममतांचा उजवा पाय सूजला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे,’ अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाच्या तळव्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. तसंच त्यांच्या पायावर खरचटल्याच्या खुणा आहेत. त्यांच्या उजव्या खांद्यालाही दुखापत झाली आहे. ममतांच्या मनगटाला तसेच त्यांच्या गळ्याला देखील दुखापत झाली आहे. त्यांना पुढील 48 तास हॉस्पिटलमध्येच निगराणीखाली ठेवण्यात येईल अशी माहिती SSKM हॉस्पिटलचे डॉक्टर एम. बदोपाध्य यांनी दिली आहे.
पाच डॉक्टरांची विशेष टीम
ममता बॅनर्जी यांच्या उजव्या पायाचा एक्स-रे करण्यात येईल. तसेच त्यांचा एमआरआय (MRI) देखील करणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या दुखापतीचे निदान झाल्यानंतर पुढील उपचारांबाबत ठरवले जाईल, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. एमआरआय चाचणीनंतर ममता यांना विशेष वॉर्डामध्ये नेण्याची शक्यता आहे. त्यांच्या उपचारासाठी पाच सदस्यीय वरिष्ठ डॉक्टरांची विशेष टीम देखील बनवण्यात आली आहे.
राज्यपालांना विरोध
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांनी बुधवारी रात्री ममता बॅनर्जी यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी हॉस्पिटलच्या बाहेर उपस्थित असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करत ‘राज्यपाल परत जा’ अशी घोषणाबाजी केली. राज्यपालांनी या प्रकरणावर रिपोर्ट सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
राज्यपालांनी बुधवारी घडलेल्या घटनेनंतर अर्ध्या तासांमध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले.राज्यपाल जवळपास अर्धा तास ममता बॅनर्जींच्या खोलीमध्ये होते. यावेळी ममतांनी त्यांना घटनेची माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .