मंठ्यात रूंद सरी व वरंबा तंत्रज्ञान वापराविषयी कृषी विभागाकडुन माहिती..!

| जालना | मंठा तालुक्यातील पाकणी येथे कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने खरीप हंगामातील पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धत पेरणी या मोहिम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ( बीबीएफ ) रुंद सरी व वरंबा तंत्रज्ञान वापराबाबत प्रचार व प्रसार कार्यक्रम घेण्यात येत आहे.

पाकणी येथे बीबीएफ यंत्राचा वापर करून पेरणी केल्याने पिकाला होणारा फायदा हा उत्पन्न वाढविण्यासाठी कसा होऊ शकतो. यामध्ये तन नियंत्रणाच्या व अंतर्मशागतीच्या दृष्टीने महत्वाचे, एकरी 10 किलो बियाण्याची व खतांची बचत होते.पावसाचा खंड पडल्यास सरी द्वारे पाणी व्यवस्थापन केल्या जाते. अतिरिक्त पाणी शेतात न थांबता सरी वाटे बाहेर निघून जाण्यास मदत मिळते.जमिनी मध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. अशी माहिती शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी व्ही.जे.राठोड यांनी दिली. यावेळी कृषी सहायक ए.के.मोरे , तालुका व्यवस्थापक आर.एम.मोहाडे व रोहन कोहिरे यांच्यासह गावातील बळीराजा शेतकरी गटाचे अध्यक्ष फयाज देशमुख व गटातील मनोहर खरावणे, अंबरसिंग राठोड, विष्णू निंबाळकर सदस्य उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *