मराठीमाती प्रतिष्ठानच्या भरघोस प्रतिसाद लाभलेल्या राज्यस्तरीय प्रतिष्ठित निबंध स्पर्धेचा निकाल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर..!

| ठाणे | मराठीमाती प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्षातील विक्रमी ५८७ निबंध स्पर्धेनंतर या वर्षातील ६०३ प्राप्त निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच खासदार व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. कार्यतत्पर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठित राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा प्रत्येक वर्षी मराठीमाती प्रतिष्ठान आयोजित करत असते. अतिशय उदंड प्रतिसाद या स्पर्धेला भेट असल्याचे आयोजक अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी दैनिक लोकशक्ती शी बोलताना सांगितले.

या स्पर्धेसाठी मराठीमाती प्रतिष्ठानचे सचिव प्रविण काळे, खजिनदार सचिन घोडे, कार्याध्यक्ष विकास चव्हाण, उपाध्यक्ष विद्या भोते तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी व विश्वस्त मारुती बोराडे, किरण लहामटे, योगेश घरत, अतुल आवटे, निलेश मोरे, सुनील मंचरे, सोमनाथ कुदळे, अरुण घोडे, गिरीश शेलार, संतोष भोये, प्रतिक मडावी, अशोक मिसाळ, अमोल आग्रे, राजश्री गायकवाड आदी यांनी मेहनत घेतली.

या स्पर्धेतील सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देखील दिले जाईल तसेच येणाऱ्या प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अथवा ऑनलाईन याचे पारितोषिक वितरित केले जाईल, असे प्रतिष्ठानने जाहीर केले आहे.

असा आहे स्पर्धेचा निकाल :

• प्रथम क्रमांक

सौ. स्मिता थोरात, पुणे
विषय : गड किल्ले जगात भारी करण्यासाठी माझ्या मनातील वास्तववादी कल्पना
(७७७७/- व प्रमाणपत्र)

• द्वितीय क्रमांक

श्री. अशोक कदम, रत्नागिरी
विषय : मराठी भाषा , अभिजात दर्जा व महाराष्ट्र शासन
( ६६६६/- व प्रमाणपत्र)

• तृतीय क्रमांक

श्री. हर्षल वैद्य, वर्धा
कोरोनाने मला काय शिकवले..?
( ५५५५/- व प्रमाणपत्र)
_______________________________________

उत्तेजनार्थ ३ बक्षिसे (प्रत्येकी २२२२/- )

१. श्री. रोहित शिंदे, नांदेड
सर्वश्रेष्ठ कोण : केंद्र सरकार की राज्य सरकार..?

२. डॉ. संदेश पाटील, कोल्हापूर
विषय : गड किल्ले जगात भारी करण्यासाठी माझ्या मनातील वास्तववादी कल्पना

३. श्री. अनिकेत औटी, ठाणे
विषय : बापू, इंदिरा, मोदी आणि ‘ लोकशाही ‘
______________________________________

विशेष उत्तेजनार्थ ( प्रत्येकी ५०१/-)

१. श्री. भरत भाऊराव जानेफळकर, वाडा, पालघर
विषय : कोरोनाने मला काय शिकवले.?

२. सौ. शबनम शेख, मुंब्रा
विषय : मराठी भाषा , अभिजात दर्जा व महाराष्ट्र शासन

३. सौ. उर्मिला देशपांडे, मुलुंड
विषय : कोरोनाने मला काय शिकवले.?

४. सौ. वृषाली पंकज मार्के, कल्याण
विषय : गड किल्ले जगात भारी करण्यासाठी माझ्या मनातील वास्तववादी कल्पना

५. कुमारी शर्वरी राजेश पेडणेकर, फोंडाघाट, सिंधुदुर्ग
विषय : मराठी भाषा , अभिजात दर्जा व महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *