मंत्री एकनाथ शिंदे पुन्हा देवदूतसारखे आले धावून, पूर्ण केला दिलेला शब्द..!

| मुंबई | रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामधील केवणाळे पुरग्रस्त भागात दुर्घटनेमुळे पाय गमावलेल्या साक्षीची मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी KEM रुग्णालयात भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली. याप्रसंगी
KEM हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रविण बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून साक्षीच्या रुग्णालयातील उपचारासाठी त्वरेने 5 लक्ष रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे.

जगातील सर्वात उत्तम तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक कृत्रिम पाय साक्षीला बसविण्याच्या ना. श्री. शिंदे यांनी यावेळी डॉक्टरांना सूचना दिल्या. याशिवाय साक्षी आणि प्रतीक्षा या दोन्ही बहिणींचा पुढील शिक्षणाचा पूर्ण शैक्षणिक खर्च डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून केला जाणार आहे.

याप्रसंगी दोन महिन्याच्या बाळाला वाचविण्याऱ्या साक्षीच्या अतुलनीय धाडसाचे ना. शिंदे यांनी तोंड भरून कौतुक केले.

साक्षीचे धाडसी कार्य :

पूरस्थितीत पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात एका दोन महिन्याच्या मुलाला वाचवताना भिंत अंगावर कोसळून साक्षी दाभेकर (वय १४) ही क्रीडापटू जबर जखमी झाली होती. तिला तातडीने मुंबईत हलवण्यात आले असून, ‘केईएम’मध्ये डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला आहे. या मुलीची घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराच्या लाखो रुपयांच्या खर्चाचा प्रश्न तिच्या परिवारापुढे पुढे उभा राहिला होता. त्यातून मंत्री शिंदे यांनी मार्ग काढून तिचा वैद्यकीय खर्च डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन करणार असल्याचे घोषित केले.

ही मुलगी धावपटु आहे, कब्बडी आणि खो खो तालुकास्तरावर खेळते. पण आता तिला पाय गमवावा लागल्याने कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं जातं होतं. या पार्श्वभूमीवर ना. शिंदे यांनी हा आर्थिक मदतीचा प्रश्न पूर्णतः मार्गी लावला आहे. याबद्दल साक्षीच्या कुटुंबीयांनी मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *