नाणार प्रकरणावरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, प्रकल्प गमावू नये अशी घातली साद..!

| मुंबई | नाणारचा रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावू नये अशी विनंती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. प्रकल्प गमावणं महाराष्ट्राला परवडणारं नाही. भूमीपुत्रांच्या मागणीचा विचार व्हावा पण प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. त्यामुळे हा प्रकल्प गमावू नये असं राज यांनी म्हटलंय. कोरोनानंतर आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनानंतर सरकार आर्थिक चणचणीत आहे. रोजगार नाहीयेत याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं.

कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला.राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी. ‘ असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला पत्र पाठवलं आहे.

दरम्यान, रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नाणार प्रकल्प राज्याने गमवू नये, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *