राष्ट्रीय पेंशन योजनेचे फॅार्म भरण्याच्या सक्तीला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन पुणे व संपुर्ण राज्याचा विरोध; जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांची माहिती..

| पुणे | सध्या महाराष्ट्रभर एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना DCPS (अंशदायी पेन्शन ) योजनेतून राष्ट्रीय पेंशन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठीचे सी एस आर एफ(CSRF) फॉर्म भरण्याची सक्ती केली जात आहे. ही योजनेचे ध्येय धोरणे अद्याप स्पष्ट नाहीत व ती शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे.म्हणून राष्ट्रीय पेंशन योजनेला जुनी पेंशन हक्क संघटनेचा विरोध असल्याचे संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी सांगितले आहे.

यावेळी दिलेल्या माहिती नुसार सदराच्या योजने बाबत शिक्षणाधिकारी पुणे यांनी यांनी एक मेसेज पाठवला असून त्यानुसार जर शिक्षकांनी सी एस आर एफ फॉर्म भरले नाही तर माहे फेब्रुवारी चे वेतन देयक स्वीकारले जाणार नाही.असे सांगितले आहे. परंतु याबाबत सदर शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. कारण अजून DCPS योजनेचे हिशोब मिळालेले नाहीत तसेच राष्ट्रीय पेंशन ही योजना नक्की काय आहे?याबाबत शिक्षकांना कोणतीही माहिती नाही.या योजनेत मयत अथवा सेवानिवृत्त शिक्षकांच्या कोणते लाभ मिळणार याबाबत संभ्रम आहे.जुन्या डीसीपीएस योजनेमध्ये कपात झालेल्या रकमा त्यावरील शासनाचा वाटा व व्याज ही एकत्रित रक्कम एनपीएस योजनेमध्ये ओपनिंग बॅलन्स दाखवली जाणार आहे का? याबाबत हमी नाही.यामुळे नवीन एनपीएस योजनेला शिक्षकांचा प्रचंड विरोध आहे.

सदर NPS योजना फसवी आहे. केंद्राच्या NPS योजने प्रमाणे फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युटी राज्याच्या NPS मध्ये नाही असा आरोप जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी केला आहे. सदर योजने बाबत असणाऱ्या शंका जिल्हा संघटन ने तयार केलेल्या फॅारमॅट मध्ये प्रत्येक तालुका कार्यकारणीने सर्व सभासदाकडुन ५ प्रतित भरुन घेऊन जिल्हा संघटन कडे एक प्रत व शिक्षणाधिकारी यांना मुख्याध्यापक यांचे मार्फत पाठवून देण्याचे आवाहन सरचिटणीस वैभव सदाकाळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.