ऑनलाईन स्पर्धेच्या भव्यदिव्य बक्षीस वितरण सोहळा उद्या कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित पार पडणार..!

| औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना औरंगाबाद च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धाच्या भव्य बक्षिस वितरण समारंभाला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व NPS/DCPS धारक शिक्षक-शिक्षिकांनी आपली उपस्थिती दाखवून ताकद दाखवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला ना. श्री. संदिपानजी भुमरे साहेब रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पाळणार आहे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.मिनाताई रामराव शेळके (जि.प.अध्यक्षा, औरंगाबाद) तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नीलेश गटणे (मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प औरंगाबाद), श्री . बी.बी. चव्हाण (शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा सहायक शिक्षण उपसंचालक औरंगाबाद), श्री. अविनाश पा.गलांडे (शिक्षणसभापती, औरंगाबाद), श्री. राकेश साळुके (उपशिक्षण अधिकारी), श्री एल.जी. गायकवाड( जि.प. उपाध्यक्ष ), श्री.किशोरनाना बलांडे (अर्थ व बांधकाम सभापती), श्री. विलास ( बापु ) भुमरे (जिल्हा परिषद सदस्य), श्री. मधुकर वालतुरे ( स्थायी समिती सदस्य ) सौ.अनुराधा ताई चव्हाण, ( महिला व बालकल्याण सभापती), सौ.मोनालीताई राठोड(समाजकल्याण सभापती), श्री.रमेश पवार (जिल्हा परिषद सदस्य), श्री. बळीराम भुमरे (निमंत्रित जिल्हा परिषद सदस्य) आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे स्थळ आर्यभट्ट हॉल ,एम.जी.एम. चे जवाहरलाल नेहरु इंजि . कॉलेज ( जे.एन.इ.सी. ) एन -६ , सिडको,औरंगाबाद उद्या सोमवार दि. २० रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, औरंगाबाद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.