| नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
पश्चिम बंगालमधल्या 294 जागांसाठी, तमिळनाडूतल्या 234 जागांसाठी, केरळातल्या 140, आसाममधल्या 126 तर केंद्रशासित पुदुच्चेरीतल्या 30 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 824 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. 18.68 कोटी मतदार यासाठी आहेत.
आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. 27 मार्चपासून मतदानाला सुरुवात होईल. मतमोजणी 2 मेला होईल.
केरळ आणि तमिळनाडूत आणि पुदुच्चेरीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 6 एप्रिलला मतदान होईल आणि 2 मे रोजी मतमोजणी आणि निकाल लागेल.आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.
बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक टप्यात मतदान होणार आहे.
सध्या राज्यात कोणाचे सरकार?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे. यासह केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डावे लोकशाही आघाडीचे सरकार आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये सर्वांनंद सोनवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन आहे. त्याचवेळी पुडुचेरी मध्ये नारायणसामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सरकार होती जी शेवटच्या काही दिवसात अल्पसंख्याक मध्ये आल्यामुळे पडली. आता तिथे सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे.
यावेळी तामिळनाडूच्या 234, पश्चिम बंगालच्या 294, आसामच्या 126, पुडुचेरीच्या 30 आणि केरळच्या 140 जागांवर निवडणुका होणार आहेत.
पश्चिम बंगालमधील 294 जागांवर निवडणुका:
2016 च्या निवडणूकीत TMC पार्टीने 211 जागांवर विजय मिळवत त्यांचं सरकार स्थापन केलं होत.
त्यावेळी डाव्या आणि कॉंग्रेसच्या आघाडीला 76 जागा जिंकता आल्या. आणि यावेळी पश्चिम बंगालमध्ये आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या भारतीय जनता पक्षाला तेव्हा फक्त 3 चं जागांवर विजय मिळवत समाधान मानाव लागलं होत. बाकी 4 जागा इतरांच्या खात्यात गेल्या होत्या.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाने 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या भाजपा विधानसभा निवडणुकीत जोर लावताना दिसत आहे.
आसाममधील 126 जागांवर निवडणुका:
2016 मध्ये 86 जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने आसाममध्ये आपलं सरकार बनवलं होत. कांग्रेसला 26 जागा आणि AIUDF ला 13 जागा मिळाल्या होत्या. इतरांकडे 1 जागा होती.
तामिळनाडूमधील 234 जागांवर निवडणुका:
134 जागा जिंकून AIDMK आघाडीने सरकार स्थापन केलं होतं. DMK आणि काँग्रेसच्या आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या.
पुडुचेरीच्या 30 जागांवर निवडणूका:
पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात 30 जागा आहेत. इथे विधानसभेत 3 नामित सदस्य असतात. आतापर्यंत इथे काँग्रेस आघाडीचे सरकार होते परंतु गेल्याच आठवड्यात काही आमदारांनी काँग्रेस सोडल्यामुळे हे सरकार अल्पसंख्याक झाले. त्यामुळे सध्या इथे राष्ट्रपती राजवट लागू आहे.
केरळमधील 140 जागांवर निवडणूका:
डाव्या पक्षांचा शेवटचा गड असलेल्या केरळमध्ये 140 जागांवर निवडणुका होणार आहे. इथे डावे पक्ष आणि काँग्रेसचे युतीचे सरकार आहे. डाव्यांकडे 91 आणि काँग्रेसच्या यात 47 जागा आहेत. भाजपा आणि इतरांच्या खात्यात 1 – 1 जागा आहे.
अवश्य ’25 वर्ष विचार केला नाही पण आता राजकारणात येणार,’ रॉबर्ट वाड्रांची घोषणा
केंद्रीय दलाच्या 250 तुकड्या तैनात :
दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाबरोबर झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारने अर्धसैनिक सैन्य दलाच्या 250 कंपन्यांची 5 निवडणूक राज्यांमध्ये तैनाती सुरू केली आहे. या कंपन्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा डाळ, सीमा सुरक्षा दल आणि अन्य सुरक्षा दलातील जवानांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील 125 कंपन्यांना मध्यवर्ती दलात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय तामिळनाडूमध्ये 65, आसाममध्ये 70, पुडुचेरीमध्ये 10 आणि केरळ मध्ये 30 कंपन्या तैनात केल्या आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .