‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..!

| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या तरुणांची व्यथा मिटवण्यात महाराष्ट्र सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता नोकरीला लागूनही ही परीक्षा पास न होऊ शकलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. कारण शिक्षण संचालक पुणे यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी काढलेल्या परिपत्रकावर न्यायालयाने शिक्कामाेर्तब केेले आहे.

२०१३ नंतर शिक्षक पात्रता परीक्षा सुरू झाल्यावर राज्याने डीएड, बीएड व इतर पात्र अभ्यासक्रम उत्तीर्ण व शिक्षण क्षेत्रात अध्यापनासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी कालमर्यादा निश्चित केली होती. त्यांना ३ प्रयत्नांमध्ये पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याची मुभा दिली होती.

पुढे केंद्राच्या सुधारित नियमानुसार बदलही करण्यात आले. मात्र, पुरेशी संधी देऊनही काही उमेदवार परीक्षेत नापास झाले, तर अनेकजण परीक्षेला अनुपस्थित राहिल्याने अखेरीस त्यांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे.

शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण होत नसतील तर उमेदवारांच्या सेवा समाप्तीचे परिपत्रक शिक्षण संचालक पुणे यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी काढले होते. त्यालाच अनुत्तीर्ण उमेदवार व परीक्षेला अनुपस्थित शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान देऊन सेवा समाप्त करू नयेत, अजून संधी देण्याची विनंती केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी च्या सेवा तात्काळ समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

आमच्या बातमी कमी पण अचूक, सखोल नि महत्वाच्या असतात, त्यामुळे नक्की आम्हाला फॉलो करायला विसरू नका..!

Leave a Reply

Your email address will not be published.