या तीन बँकांमध्ये तुमचे पैसे आहेत सुरक्षित..! पहा कोणत्या आहेत त्या बँका..!

| मुंबई | देशात गेल्या काही वर्षांमध्ये बॅंकिंग क्षेत्रात आर्थिक गैरव्यवहार झाले. बँकाना काही बड्या खातेधारकांनी गंडा घातला. पण त्याचा फटका हा सामन्य खातेधारकांना बसला. यामुळे बँकेतील व्यवहारांवर मर्यादा घालण्यात आली. यामुळे सर्व सामन्यांची गैरसोय झाली. तसेच दिवसेंदिवस होणाऱ्या बँकेतील गैरव्यवहारांमुळे आपला बॅंकेतील ठेव सुरक्षित आहे ना, असा प्रश्न असंख्य खातेधारकांसमोर निर्माण झाला. मात्र आता थेट आरबीआयने व्यवहारासाठी आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी कोणत्या बँका सुरक्षित आहे, याची माहिती दिली आहे. यामुळे खातेधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

भारतीय स्टेट बॅंक (SBI), आयसीआयसीय बँक (ICICI) आणि एचडीएफसी बॅंक (HDFC) या 3 बँकेत तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयने D-SIB यादी प्रसिद्ध करत याबाबतची माहिती दिली आहे.

D-SIB म्हणजे काय?

D-SIB म्हणजे Domestic Systemically Important Banks. डीएसआयबी यादीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या बँका या विश्वासार्ह आहेत. म्हणजेच या वरील 3 बॅंकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैशांबाबत चिंता करण्याची गरज नाही. कोरोना काळात बॅंकिंग क्षेत्रात घसरण झाली होती. तसेच येस बॅंक प्रकरणानंतर बँकेत पैसे ठेवायचे की नाहीत, असा यक्ष प्रश्न सामन्यांसमोर उपस्थित झाला होता. मात्र आता आरबीआयने ही यादी प्रसिद्ध केल्याने 3 बँकामधील खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.

आरबीआयने काय म्हटलं?

आरबीआयने D-SIB 2020 ही यादी प्रसिद्ध केली. याद्वारे सांगितलं की SBI,ICICI आणि HDFC या बँकांनी अनेकांना कर्ज दिलं आहे. यानंतरही कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही या बँकांवर कोणताही परिणाम झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *