पानवण शाळेचा राज्यातील आदर्श शाळा प्रकल्पासाठी पुन्हा समावेश..

| सातारा | पानवण ( ता. माण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला आदर्श शाळा प्रकल्पामध्ये पानवण ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नाने पुनश्च समावेश झाला आहे.

जिल्हा परिषद शाळा पानवणची राज्यातील आदर्श शाळा उपक्रमासाठी पहिल्या यादीत निवड करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण मार्फत तपासणी सुद्धा झाली. शाळेचा दर्जा पाहून त्यांनीही कौतुक केले. परंतु अंतिम यादी मध्ये मात्र पानवण शाळेचे नाव नसल्याचे समजल्यानंतर मात्र सर्व ग्रामस्थांची निराशा झाली. त्यानंतर पानवण शाळेचे नाव यादीत समाविष्ट होणेसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार सर्व ग्रामस्थानी केला आणि त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना श्री. संभाजी होळकर बारामती तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. तसेच सातारा जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना ग्रामस्थानी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. राज्याचे विधानपरिषद सभापतीश्री. रामराजे निंबाळकर यांना मा. श्री. सुभाष नरळे सर मा. अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांच्या समवेत निवेदन देणेत आले. मा. रामराजे निंबाळकर यांनी फोनवरून मंत्रालयातील अधिकारी वर्गाला शाळेचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या. श्री. प्रभाकर देशमुख मा. सचिव जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनीही वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून प्रयत्न केले. तसेच मा. श्री. अनिल देसाई संचालक सातारा जि. म, सह. बँक यानीही सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून शाळेचा समावेश करण्याबाबत सूचना केल्या. तसेच मा. श्री. अभयदादा जगताप यानाही ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच मा. श्री. जगन्नाथ विरकर उपजिल्हाधिकारी यानाही ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यानीही याकामी ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिले. या सर्वांच्या प्रयत्नातून पानवण शाळेचा आदर्श शाळा प्रकल्पात पुन्हा एकदा समावेश झाला. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पानवण शाळेचा आदर्श शाळा उपक्रमांमध्ये समावेश होणेकामी गावातील सौ. जयश्री नानासो शिंदे सरपंच पानवण, श्री. धुळा वसंत शिंदे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री. धनाजी आबाजी शिंदे चेअरमन, डॉ. श्री. नानासो शिंदे, श्री. दत्तात्रय शिंदे शेटजी, श्री. संभाजी शिंदे तात्या , श्री. महादेव मनोहर शिंदे मुकादम, श्री.मामासाहेब शिंदे,एच.आर नरळे, श्री. राजाराम तोरणे गुरुजी, श्री. कैलास तोरणे गुरुजी, श्री. विद्याधर चव्हाण गुरुजी, श्री. दत्तात्रय शिंदे गुरुजी व सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *