परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयातील याचिका कोर्टाने फेटाळली, उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश..!

| मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी घेण्यात येणार होती. या प्रकरणाचे गांभीर्य आम्ही समजतो, मात्र याची सुनावणी उच्च न्यायालयात होऊ शकते. तुम्ही उच्च न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडा, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने परबीर यांची याचिका फेटाळून लावली.

हिंदी वृत्तवाहिनी आजतकने आपल्या संकेतस्थळावर न्यायालयातील कार्यवाहीची माहिती प्रसिद्ध केली आहे. ती पुढील प्रमाणे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुनावणीस आल्यानंतर, ‘हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे, या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने का करावी, उच्च न्यायालयाने का नाही?

मुकुल तुम्ही सांगा की 226 अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी का होऊ शकत नाही? तुम्ही केवळ अनुच्छेद 32 चे उदाहरण देत आहात.’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

आक्षेप घेणाऱ्या पाटिल यांच्या वकिलाने ही सुनावणी उच्च न्यायालयात घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावर परमबीर सिंह यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की 32 च्या आधारे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आम्ही न्यायालयासमोर ठेवले आहेत.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले की या प्रकरणात तुम्ही काही आरोप करत आहात आणि मंत्री काही आरोप करत आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालयात का सुनावणी होऊ शकत नाही, आम्ही हे मानतो की हे प्रकरण निश्चितच गंभीर आहे, पण याची सुनावणी तुम्ही उच्च न्यायालयात करू शकतात आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या तिथे मांडू शकतात.

यावर, ‘आम्ही उच्च न्यायालयात आजच याचिका दाखल करू, तुम्ही उच्च न्यायालयास सुनावणी उद्याच घेण्यास सांगा’, अशी विनंती मुकुल रोहतगी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *