(प्रतिनिधी):पेण-रायगड : आकर्षक , मनमोहक आणि अलंकारांनी सजलेल्या गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेली पेण नगरी गेले दोन दिवस शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेची साक्ष ठरली. निमित्त होते पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. तर्फे आयोजित सुवर्णमहोत्सवी क्रिकेट स्पर्धा.
स्वर्गीय श्री ना भि दाबके गुरुजींनी स्थापन केलेली आणि रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अग्रगण्य पतपेढी म्हणून ओळखली जाणारी पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. ह्या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने संस्थेतर्फे शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा पेण नगरपरिषदेच्या “सचिन तेंडुलकर मैदान” येथे दि ५/०४/२०२४ आणि ६/०४/२०२४ दरम्यान पार पडल्या
संस्थेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने सभासद शिक्षक शिक्षकांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणू गेले दोन दिवस या स्पर्धा खेळवल्या जात आहेत
रवींद्र विनायक पाटील , चेअरमन पेण सोसायटी
सदर स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातून तालुका निहाय एकूण १५ संघांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी कर्जत , पेण , श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्याच्या संघांनी अंतिम चार संघात येण्याचा पान पटकावला . अंतिम सामना हा कर्जत आणि पेण या दोन संघांत खेळवला गेला . या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज श्री संभाजी पथारे यांच्या नेतृत्वात कर्जत संघाने पेण तालुक्याचा पराभव करत विजेते पदावर नाव कोरले
स्वर्गीय आदरणीय श्री ना भि दाबके गुरुजी यांनी लावलेल्या रोपट्याचा आज एक वटवृक्ष झालेला आपण सर्वजण पाहत आहोत. वर्षभर अध्ययन अध्यापन करत असताना शिक्षकांच्या सुप्त क्रीडा गुणांना वाव देणेही अत्यन्त गरजेचे आहे. त्या विचारातून संचालक मंडळाने ह्या स्पर्धा भरवल्या. जिल्हा भरातून सभासद शिक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला . त्या सर्वांचे मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व विजयी तसेच सहभागी संघाचे अभिनंदन. जय सहकार
श्री सोपान चांदे – मानद सचिव , पेण पतपेढी
स्पर्धेचा अंतिम निकाल असा….
- कर्जत संघ – विजेता
- पेण संघ – उपविजेता
- श्रीवर्धन संघ – तृतीय क्रमांक
- मुरुड संघ – चतुर्थ क्रमांक
वैयक्तिक उकृष्ठ कामगिरी करणारे शिक्षक बांधव
- मालिकावीर :- संतोष पवार , पेण
- सर्वोत्तम फलंदाज :- संभाजी पथारे , कर्जत
- उकृष्ठ गोलंदाज :- हरीश दहिफळे , कर्जत
- उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक :- नरेश पवार , पेण
या विजयाने शिक्षकांच्या मनामध्ये एक सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यामध्ये नक्कीच होईल याची मला खात्री वाटते. संघनायक श्री संभाजी पथारे व सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. कर्जत तालुक्याचा गटशिक्षणाधिकारी म्हणून मला माझ्या सर्व शिक्षकांचा सार्थ अभिमान आहे.
संतोष दौंड
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती कर्जत
प्रथम क्रमांक च्या चषकासह कर्जतचा विजयी संघ
विजयी संघाचे कर्जत शहरात स्वागत सत्कार करताना कर्जत तालुक्याचे मा गटशिक्षणाधिकारी श्री दौंड साहेब आणि इतर मान्यवर
Heartily congratulations all of you 💐💐💐💐