पिंपरखेडा येथे विना अनुदानित तत्वावर बीज प्रक्रिया मोहीम संपन्न ..!

| जालना | मंठा तालुक्यातील पिंपरखेडा येथे कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने खरिप हंगामातील उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी जिल्हा अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बीजप्रक्रिया तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वापरा बाबत प्रचार व प्रसार कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

यात [ता.२५] सोमवार रोजी पिंपरखेडा या ठिकाणी बीजप्रक्रिया करून पेरणी केल्याने पिकाला होणारा फायदा, हा उत्पन्न वाढविण्यासाठी कसा होऊ शकतो, या मध्ये

1) जमीनीची सुपीकता वाढून पोत सुधारतो.
2) मुळांच्या संख्येत व लांबी मद्ये भरपूर वाढ झाल्यामुळे जमिनीत मुख्य खोडापासून दूरवर व खोलवर असणारी अन्नद्रव्ये शिवाय पाणी पिकास उपलब्ध झाल्यामुळें उतापदानात वाढ दिसते.
3) पिकांची रोग व कीड प्रतिकार शक्ती वाढते व पीक रक्षण खर्चची बचत होते.
4) धान्यांचा दर्जा सुधारतो पिकांचे उत्पादन साधरण 15 ते 30 टक्के पर्यंत वाढते.
5) दुबार पेरणीसाठी उपयुक्त नत्र साठा शिल्लक राहतो.

✓ जिवाणू खते वापरतांना खलील गोष्टी लक्षात ठेवावे 1) जिवाणू खते सूर्य प्रकाशात ठेऊ नये.
2) जीवाणू खते बुरशी नाशके, तण नाशके व रासायनिक खते बरोबर मिसळू नये.
3) जिवाणू खते बियांनास लावल्यानंतर अर्धा तास सावलीत वाळवावीत.
4) जिवाणू खते दिलेल्या अंतिम तारखेच्या आत वापरावीत.

हे उपस्थित शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी व्ही.जे.राठोड यांनी माहिती दिली. यावेळी आत्मा चे तालुका व्यवस्थापक आर.एम.मोहाडे व सहायक व्यवस्थापक कोहिरे यांच्यासह दत्तराव खराबे , सहजीवन शेतकरी गटाचे अध्यक्ष भरत उगडे व गटातील सदस्य संजय उगडे, गणपत खराबे, सुधाकर खराबे, कोंडीभाऊ वायाळ, अण्णासाहेब बिडवे यांच्यासह आदींची उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *