भावी अधिकाऱ्यांनी कापला हताश अधिकारी नावाचा केक, वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत..!

| मुंबई | स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल होत असतात, परिस्थितीवर मात करुन अधिकारी होयचं स्वप्न घेऊन शहरात विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात.

दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परिक्षेच्या स्पर्धेत उतरत असतात, प्रचंड मेहनत घेऊन यातील काही मोजक्याच विद्यार्थांना यश गवसते, मात्र राज्यसेवा परिक्षेत यश मिळवून देखील या उमेदवारांची प्रशासनाने थट्टा केली आहे

१९ जुन २०२० रोजी महाराष्ट्रात राज्य सेवा मुख्य परिक्षेचा निकाल लागला, यातुन तब्बत ४३१ अधिकारी निवडले गेले होते, मात्र १ वर्ष होऊन देखील यातील कोणत्यात अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही.

यामुळे संतप्त अधिकारांनी नियुक्ती रखडल्याचा सोहळा साजरा केला, यावेळी त्यांनी हताश अधिकारी नावाचा केक देखील कापला, यामुळे तरी सरकारचे आमच्याकडे लक्ष वेधले जाईल अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी उमेदवारांनी दिली आहे,

दरम्यान, यावेळी या अधिकाऱ्यांनी वेगवेगळे पोस्टर्स देखील आपल्या हातात घेतले होते, यामुळे सरकारला आता तरी जाग येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

यानंतर सर्व उमेदवारांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली, आमच्या न्यायासाठी आपण सभागृहात आवाज उठवावा अशी विनंती यावेळी विद्यार्थ्यांना त्यांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *