पूरग्रस्तांसाठी उध्दव ठाकरेंचे ११ हजार ५०० रू. कोटींचं पॅकेज जाहीर..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाचे निर्णय :

◾ पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार रुपये देणार
◾ पूर्ण घर पडलं असेल तर दीड लाखाची मदत
◾ अर्ध घर पडलं असेल तर 50 हजाराची मदत
◾ दुकानदारांना 50 हजाराची मदत देणार
◾ टपरीधारकांना 10 हजार रुपये देणार
◾ उद्यापासूनच मदत देण्यास सुरुवात होणार
◾ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नांदेड, परभणीसह संपूर्ण राज्यातील पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज जाहीर
◾ एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत
◾ 4 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान
◾ 4 हजार 500 जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई देणार
◾ जनावरांच्या मृत्यूंची 7 कोटींची भरपाई देणार
◾ 3 दिवसात पंचनामे पूर्ण होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *