रतन टाटांनी पुन्हा जिंकली ह्रदये, भारतरत्न मिळावा म्हणून लोकांनी सुरू केलेली मोहीम थांबवण्याची केली विनंती…

| मुंबई | टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी दीड हजार कोटीची मदत केली. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळेच. त्यामुळेच सोशल मीडियावर काल रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग देखील काल ट्रेंड सुरू झाला होता. सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती केली आहे.

मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यासाठी बिंद्रा यांनी ट्विटरवर #BharatRatnaForRatanTata ही मोहिम सुरू केली. या मोहिमेत लोकांना सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. या नंतर रतन टाटा यांनी सकाळी ट्वीट केले आणि म्हणाले, “मला भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. परंतु माझी एक विनंती आहे की, ही मोहिम थांबवावी. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहील”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *