
| महेश देशमुख (माढा) | पिंपळनेर ता.माढा येथील सचिन ज्ञानदेव लोंढे-पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सचिन लोंढे यांनी यापुर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा संघटक व उपाध्यक्ष या पदावर काम करीत मागील १५ वर्षे पक्षसंघटना वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याची दखल घेत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
याबबतचे पत्र माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे व जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. याप्रसंगी पिंपळनेरचे माजी सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय खंडाळे, उपसरपंच प्रतिनिधी विजयकुमार लोंढे, नागेश जाधव, विठ्ठल महाडिक, गणेश लोंढे, उमेश साडेकर, रणजित कांबळे सुशिल वाघमारे, भीमराव लोंढे उपस्थित होते. निवडीबद्दल आ.संजयमामा शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, विठ्ठल कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे यांनी लोंढे यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला जिल्हा उपाध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल लोंढे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री