सलाम : वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने करून दाखवले ‘आदर्शवत कार्य..!’

| मुंबई | सामाजिक कार्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ग्रुपच्या माध्यमातून कोरोना बेड, ऑक्सिजन, व्हॅटिलेटर मिळवून देणे, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी एकाच दिवशी ३५ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्याबरोबरच रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यापर्यंतची मदत केली जात आहे. यामुळे कित्येक रुग्णांना जीवदान मिळाले असून, या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ आणि ४० ग्रुपचे सुमारे आठ हजार ५०० सहकारी कोरोनाविरुद्धचा लढा देत आहेत. सर्वजण आपल्या राजकीय निष्टेचे जोडे बाहेर ठेवून सामाजिक भावनेतून काम करीत असल्याने त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. व्हेंटिलेटर मिळत नसल्याने रुग्ण तडफडून मरत असल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत असताना कित्येक रुग्णांना वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून प्रवीण पिसाळ, अवधूत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळवून देण्याची घडपड अविरत सुरू आहे.

महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर सामाजिक भावनेतून या सदस्यांनी एकाच दिवशी तब्बल ३५ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेऊन विक्रमी रक्त पिशव्या संकलित केल्या. यामुळे कित्येक तरुणांना रक्ताची गरज भागवता आली. कोरोनाग्रस्त रुग्णांचे नातेवाईकही प्लाझ्मा, व्हॉटलेटर, ऑक्सिजन बेड, रेमडेसिव्हिरसाठी सर्वप्रथम वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन टीमकडे मोठ्या अपेक्षेने मागणी करत आहे. या रुग्णांच्या नातेवाइकांचा कोणताही भ्रमनिरास न होता ऑर्गनायझेशनचे सदस्य मदत मिळवून देत आहेत.

एकंदरीत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने भाषा, जात, धर्म, पंथ, समाज या सगळ्या बाबी गौण असल्याचे या काळात दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *