| महाड | समाजाच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक असते. आज मी जो काही आहे त्यामागे माझ्या शिक्षक वर्गाच फार मोठं योगदान आहे असं मत महाड-माणगाव-पोलादपूर चे आमदार श्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांच्या तर्फे आयोजित शिक्षक मेळाव्याचे उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. सदर कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती श्री सुधाकरजी घारे यांची विशेष उपस्थिती होती. संघटनेचे राज्याध्यक्ष श्री राजेशजी सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला.
कोरोना काळात राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री श्री राजेशजी टोपे यांनी जनतेला रक्तदानाचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत शिक्षक परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले व २०० हुन अधिक बाटल्या रक्त संकलन झाले त्याबद्दल आमदार गोगावले यांनी संघटनेचे विशेष अभिनंदन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक , महाड येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे वतीने स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. कोरोना काळात तालुक्याची धुरा समर्थपणे संभाळल्याबद्दल तालुकाच्या पंचायत समिती सभापती सौ.सपनाताई मालुसरे यांचा तर शिष्यवृत्ती परीक्षेत महाड तालुका राज्यात प्रथम येण्यात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या महाड पंचायत समितीच्या वरिष्ठ विस्तार अधिकारी डॉ. सुनीता चांदोरकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कोरोना काळात विविध ठिकाणी सेवा देणाऱ्या शिक्षक शिक्षिकांचा कोरोना योद्धा म्हणून यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या महाड शाखेने केले तसेच श्री भिकाजी मांढरे, बाळासाहेब बारगजे यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल राज्याध्यक्ष श्री सुर्वे सर यांनी त्यांचा सत्कार केला.
✓ ” महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या ज्या काही समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्या त्यांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत केलं आणि पुढेही करत राहील. चक्रीवादळ मुळे जिल्ह्यातील १५०० हुन अधिक शाळांचे नुकसान झाले आहे व दुरुस्तीसाठी ४० कोटी चा निधी आवश्यक आहे. आतापर्यंत १४ कोटी रुपयांची तरतूद करून शाळांना आर्थिक मदत पोहोचवली आहे आणि लवकरच उर्वरित शाळांना देखील दुरुस्तीसाठी अनुदान देण्यासाठी तयारी सुरू आहे.”
– श्री. सुधाकर घारे , उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती , रायगड जिल्हा परिषद , अलिबाग
✓ ” शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचे काम शिक्षक परिषदेने सदैव केले आहे. कोविड-१९ आजाराचा समावेश वैद्यकीय प्रतिपूर्ती साठीच्या आजारांच्या यादीत करण्यासाठी परिषदेने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून त्याचा समावेश वैद्यकिय बिलांच्या यादीत झाला आहे. शिक्षण सभापती श्री सुधाकरजी घारे यांच्या मदतीने ७व्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता शिक्षकांना मिळवून दिला आहे . यापुढेही शिक्षकांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सदैव प्रयत्नशील राहील
– श्री राजेश सुर्वे , राज्याध्यक्ष , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग