सरकारकडून लवकरच ८००० पदांची मेगा भरती होणार..


! मुंबई ! नववर्षानिमित्त राज्य सरकारनं भरतीबाबत गुड न्यूज दिली आहे. नवीन वर्षात आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. दरम्यान आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागातील रिक्त पदभरतीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यातील विभागीय आयुक्तांसह  आरोग्य अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. पुढील दोन महिन्यात ही भरती प्रक्रीया सुरू करण्याच्या सूचना यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहे. आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य सेवेशी निगडीत पदं भरली जाणार आहेत. राज्य शासनानं भरतीला मान्यता दिली आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *