
| नाशिक | नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची होणारी बदली न्यायालयाने रोखली आहे. सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मोहीम सुरु केली होती.
मात्र त्यांची बदलीच्या सुचना देण्यात आली होती. यानंतर शेतकरी सचिन पाटील यांच्या पाठीशी असल्याचं दिसतं आहे.
सचिन पाटील यांच्या जागी शहाजी उमाप पोलीस अधिक्षक पदाचा कारभार स्वीकरणार होते. पाटील यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागात उपायुक्तपदी बदली झाली होती. मात्र न्यायालयाने त्याआधीच त्यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. राज्यातील 32 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. यात सचिन पाटलांचा देखील समावेश होता.
गणेश विसर्जन झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना सोडण्यात येणार होतं. मात्र कार्यकाळ पुर्ण न झाल्यानं केवळ आमदाराच्या पत्रावर बदली करण्याचा निर्णय न्यायालयाने फटकारलं आहे. त्यानंतर सचिन पाटलांची बदली स्थगित झाली आहे.
दरम्यान, सचिन पाटलांनी राबवलेल्या मोहीममुळे त्यांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. अशातच सचिन पाटील यांची बदली स्थगित करण्यात आल्याने पत्र लिहिणारे आमदार नक्की कोण? याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..