विशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले

देणा-या ने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेणा-याने एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत, असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणा-या विंदा करदिकरांच्या काव्य पंक्तीप्रमाणे आम्ही जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत आझाद भाऊंवर ठेवलेला विश्वास त्यांनी मी कोरोना बाधित असताना मला कै.कॉ.बाबासाहेब ठुबे कोविड केअर सेंटरमधील मिळालेल्या सेवेमधून सार्थ ठरला असल्याची पुन्हा एकदा नव्याने प्रचिती आली.

पहाटे ५ वा. पासुनच सुरु होणारे आझाद ठुबे व त्यांच्या सहका-यांचे सेवासत्र रात्रीच्या १२ वा.पर्यंत अविरत चालू असलेले आम्ही पाहीले आहे. या सत्रात सकाळी शक्य होईल त्यांचे प्राणायाम, ७:३०वा. चहा,नाष्टा, प्रत्येक रुग्नासाठी दोन अंडी, ८:०० वा.ग्रामिण उपकेंद्रातील डॉक्टरांचा राऊंड, सकाळी ११:३० वा.पौष्टीक व सुग्रास जेवण, दुपारी फलाहार,३:०० वा. पुन्हा ग्रामिण रूग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड, ४:०० वा. चहा बिस्किट, ५:०० वा.डॉ.महेश ठुबे व त्यांच्या सौभाग्यवती डॉ.सौ.प्राजक्ता ठुबे यांचा रुग्ण तपासणीचा राऊंड, संध्याकाळी ६:०० वा. रुग्णांच्या करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम तर रात्री ८:०० वा. पौष्टिक जेवण, ९:०० वा. पुन्हा डॉ.मुकेश ठुबे यांचा राऊंड व दिवसभर रुग्णसेवेत भासणारी उणीव भरुन काढण्यासाठी तगमग करणारे शुगर पेशंट असुनही बसुन लक्ष ठेवणारे आझाद भाऊ. मी व माझी आई आम्ही दोघेही कोरोना बाधित झालो होतो वडीलांच कृपाछत्र हरवलेला मी सगळं संपलं या अविर्भावातच कै.कॉ.बाबासाहेब ठुबे कोविड सेंटरमध्ये दाखल झालो परंतू तेथे पोहचल्यावर मला व माझ्या आईला जगण्यासाठी बळ मिळालं, आम्हाला या सेंटरमध्ये मायेचा आधार अन् आमचीही जीव धोक्यात घालून आपुलकीने काळजी घेणारी आपली अशी हक्काची माणसं मिळाली. कोरोनाबाबत ऐकलेल्या मन विषन्न करणा-या गोष्टींमुळे जगण्याची आशा गमावलेलो आम्ही इथल्या काळजीवाहू माणसांत कसे रमलो व कोरोनावर कशी मात केली हे आम्हाला समजलंच नाही.

मी व माझ्यासोबतच्या शेकडो रुग्णांनी या सेंटरमध्ये राबणा-या प्रत्येक हातात व या सर्वांना गाईड करणा-या आझाद भाऊंच्या रुपात देवत्व अनुभवलं असुन कुणी मला आझाद ठुबेंबद्दल विचारलं तर मी एका वाक्यात सांगेल की,आझाद भाऊ देव नाही पण आमच्यासाठी देवापेक्षा कमीही नाही.

– सुजित तिकोणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *