विशेष लेख – एकनिष्ठा, संयमाचे फळ, दिलीप वळसे पाटील यांना गृहमंञी पद

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्टवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची गृहमंञीपदी निवड झाली. ते निश्चितपणे चांगले काम करतील यात शंका नाही.

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरवात केली. राज्यभर फिरून त्यांनी महाराष्ट्र जाणून घेतला. १९९० साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. त्यावेळी जनता दलाचे खासदार असलेले किसनराव बाणखेले यांचा तालुक्‍यावर प्रभाव होता. मात्र, १९९० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील यांनी बाणखेले यांचे गुरू अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पराभूत केले. त्यानंतर आजपर्यंत सलग सात वेळा विजय मिळवून 31 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा विभागासारखे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे होते. त्यानंतर मिळालेल्या अर्थखात्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. २००९ ते २०१४ या कालखंडात विधानसभेचे अध्यक्ष पद स्वीकारून त्यांनी पदाची उंची वाढविण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.

राजकारणातील ‘चाणक्य ’असलेले आणि राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वळसे पाटील यांच्यावरच महाआघाडी सरकारच्या विश्वासदशॆक ठरावाच्यावेळी हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. विधीमंडळात अत्यंत संयमाने आणि हुशारीने, कौशल्यपणाला लावुन सडेतोडपणे चांगला गृहपाठ करुन वळसे पाटील यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुददे फेटाळले होते. वळसे पाटील हे फडणवीस यांना सरस ठरले होते. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना कामगार व उत्पादन शुल्क मंञीपदाची जबाबदारी मिळाली. तेथेही चांगले काम केले. अनिल देशमुख यांनी गृहमंञीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी या पदासाठी सवाेत आघाडीवर नाव होते वळसे पाटील यांचे.

राष्ट्रवादी पक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी असलेेेेल्या एकनिष्ठेचे, संयमाचे फळ दिलीप वळसे पाटील यांना गृहमंञी रुपाने मिळाले आहे. यापुवीॆ सलग दहावषॆ कँबिनेट मंञी म्हणुन त्यांनी काम केले आहे. वळसे पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहमंञीपदी निश्चित चांगले काम करतील. आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपुवॆक शुभेच्छा. आंबेगावकर म्हणुन आम्हाला आपला निश्श्चित अभिमान आहे.

३० आणि ५ तारीख लकी :

वळसे पाटील यांची जन्मतारीख ३० आँक्टोबर १९५६आहे. महाविकास आघाडीच्या विश्वासदशॆक ठरावाच्यावेऴी म्हणजे ३० नोव्हेबर २०१९ रोजी हंगामी अध्यक्ष म्हणुन त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली होती. ३० डिसॆंबर २०१९रोजी वळसे पाटील यांनी कँबिनेट मंञीपदाची शपथ घेतली होती. राज्याच्या गृहमंञीपदी ५ एप्रिल रोजी निवड झाली. त्यामुळे 30आणि ५ तारीख वळसे पाटील यांच्यासाठी लकी ठरली आहे.

– राजू हिंगे, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *