ठाणे मनपा मधील गटप्रमुख राजू रोझोदकर यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट..!

| ठाणे | ठाणे मनपा मधील गटप्रमुख तथा मुख्याध्यापक राजू रोझोदकर यांना संत रविदासांचे सामाजिक – धार्मिक कार्याचे ऐतिहासिक महत्त्व या विषयात प्रतिष्ठित मुंबई विद्यापीठातून पी.एच.डी पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ठाणे महानगरपालिकेत शिक्षक, मुख्याध्यापक, गटप्रमुख अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. सध्या ते मुंब्र्यात कार्यरत आहेत.

कोणतेही काम मन लावून करायचे असा सिद्धांत त्यांनी जपला म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठी झेप घेतली आहे. कायद्याची देखील पदवी त्यांनी मिळवली असून आता मिळालेल्या डॉक्टरेट पदवी मुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

दरम्यान, शिक्षण उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त महादेव जगताप, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, लेखाधिकारी अजित धुरी, गटाधिकारी संगीता बामणे, अस्लम कुंगळे यांनी प्रशासनाकडून तर ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, ठाणे पालघर शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष तथा संचालक बाबाजी फापाळे, संचालक प्रकाश गायकवाड, संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र निकम, जगन जाधव, राजेंद्र बामणे, एक्का फाउंडेशनचे प्राजक्त झावरे पाटील, सचिन घोडे, विकास चव्हाण, किरण लहामटे, अरुण घोडे, मारुती बोराडे, गिरीश शेलार, योगेश घरत आदी यांनी देखील त्यांच्या प्राविण्याबद्दल अभिनंदन केले आहे.

” इतिहास हा समाजाचा आरसा आहे. आपण काय केले किंवा इथून पुढे काय करणे अपेक्षित आहे, हे इतिहास आपल्याला शिकवत असतो. संत रविदास यांनी केले कार्य असेच अद्वितीय आहे. त्या कार्याची एका वेगळ्या दृष्टीकोनातून येणाऱ्या पिढीला ओळख व्हावी, हा प्रयत्न या प्रबंधातून केला आहे. मुंबई सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठातून ही पदवी प्राप्त झाल्याने आनंद तर आहेच.”

– डॉ. राजू रोझोदकर, कल्याण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *