ठाणे-पालघर शिक्षक पतपेढीकडे मृत DCPS धारक सभासदास 30 लाखाची सानुग्रह अनुदानाची शिक्षक सभासदांकडून आग्रही मागणी..

| ठाणे | डीसीपीस/NPS धारक शिक्षकांचा दुर्देवाने आकस्मित मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला शासनाकडूनही अक्षरशः वाऱ्यावर सोडले जात आहे. राज्यात आजपर्यंत हजारो शिक्षक बांधवांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबाला हवी तश्या प्रकारची मदत शासनाकडून होत नाही. अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या पत्नीला रोजंदारीवर कुटूंबाची गुजराण करावी लागत आहे, असे असताना शिक्षकांच्या हितासाठी स्थापन झालेली शिक्षक पतपेढीने तरी अशा कुटूंबाला मदत करून त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करून हातभार लावायला पाहिजे. ही सबंध DCPS धारक शिक्षकांची एकमुखी जिव्हाळ्याची मागणी आहे.

शिक्षक पेढी ही फक्त शिक्षकांना कर्जबाजारी करण्यासाठीच आहे का? हा प्रश्न आज तमाम dcps धारक शिक्षकांना पडला आहे.. महाराष्ट्रात फक्त 1000 ते 2000 सभासद असणाऱ्या अनेक शिक्षक पतपेढ्या जर 30 लाखांचे सानुग्रह अनुदान मृत dcps धारक शिक्षकांच्या कुटुंबाला देत असतील तर ठाणे-पालघर अशा दोन जिल्ह्यात विस्तीर्ण असा विस्तार असलेल्या तब्बल 10500 सभासद असलेल्या ठाणे -पालघर पतपेढीला मदत करायला काय हरकत आहे? असा प्रश्न प्रत्येक सभासदाला पडला आहे.

येत्या काळात आपल्या न्याय्य-हक्कासाठी आणि रास्त मागण्यांसाठी DCPS धारक सभासद आग्रही आहेत. मागणी मान्य होत नसेल तर शांततेच्या मार्गाने DCPS धारक सभासद हजारोच्या संख्येने पतपेढी समोर उपोषणाला बसणार आहेत. येत्या काळात शिक्षक पतपेढीची निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी सदरील मागणीचा पतपेढीच्या पदाधिकारी व सन्माननीय संचालक मंडळाने हा संवेदनशील प्रश्न मार्गी लावून समस्त सभासदांना सहकार्य करावे,अशी मागणी ठाणे-पालघर जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

तसेच जर संचालक मंडळाला या बाबत फक्त राजकारण करायचे असेल तर येणाऱ्या पतपेढी निवडणूकीत सर्वांना आमची खरी ताकद दाखवून दिली जाईल, तसेच स्वतंत्र पतपेढी सुरू करण्याचा पर्याय देखील तपासून पाहिला जाईल असे या सभासदांकडून सांगण्यात येत आहे.

या विषया बद्दल वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी प्राजक्त झावरे पाटील, प्रवीण बडे, विनोद लुटे, नितीन तिडोळे आदी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले होते. परंतु सभेत त्यावर ठोस चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *