| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन / ठाणे | ओमिक्रॉन व्हेरियंट व कोव्हीड-१९च्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता शहरात उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती तात्काळ मिळण्यासाठी ठाणे महापालिकेची कोविड वॉर
अधिक सक्षम करण्यात आली असून नागरिकांनी +९१ ७३०६३ ३०३३० या वॅार रूमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड वॉर रूमने अधिक प्रभावीपणे काम केले आहे. सध्यस्थितीत ओमिक्रॉन व्हेरियंट व कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर कोविड वॉर रूम अधिक सुसज्ज ठेवण्यात आली आहे. वॉर रूमच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी +९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
वॉर रूममध्ये +९१ ७३०६३ ३०३३० या क्रमांकाशी इतर २२ संपर्क क्रमांक जोडण्यात आल्याने नागरिकांना आता संपर्क क्रमांक बिझी असल्यामुळे कोणतीही प्रतीक्षा न करता तात्काळ संपर्क साधून उपलब्ध माहिती घेता येणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्याजळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात विरवाडे-मालापूर रस्त्यावर शेतातून काम आटोपून घरी येत असणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. आरोपी मुकेश पुन्या बारेला (वय २२) यास पोलिसांनी अटक केली आहे. चोपडा तालुक्यातील विरवाडा येथील एका शेतमजुराच्या चार अल्पवयीन मुली स्वतःच्या शेतातून काम करून घराकडे परतत होत्या. त्यातील १३ वर्षीय… Read more: जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न..मानवतेला काळिमा फासणारी घटना नुकतीच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून समोर येत आहे . पोशिर येथे एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे . मृतांमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवतीचा समावेश असल्याने पूर्ण तालुका सुन्न झाला आहे . काल दि 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र श्री गणेशाच्या आगमनात व्यस्त असताना मानवी संवेदना बोथट झाल्या आहेत की… Read more: तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभाजुन्या पेन्शन योजने साठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना – ठाणे मनपा शाखेची सभा नुकतीच संपन्न झाली . राज्य कार्यकारिणी च्या सुचने नुसार या सभेत ठाणे मनपा कार्यक्षेत्रासाठी नूतन कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली . राज्य कार्यकारिणीच्या पत्रानुसार राज्य कोषाध्यक्ष श्री . प्रवीण बडे, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री.अरुण कराळे… Read more: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्रीठाणे दि.05 : मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळ्यात केले.शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतरत्न गानसम्राज्ञी मंगेशकर नाटयगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत… Read more: मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .दिनांक 1 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4.00 वाजता शिवसेना जाहीर मेळावा व पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ हॉल, पोसरी, ता. कर्जत या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाप्रसंगी श्री. हनुमानशेठ पिंगळे (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)श्री. अक्षय सोनू पिंगळे (माजी पंचायत समिती सदस्य) श्री. विश्वनाथ पाटील (माजी सभापती खालापूर पंचायत समिती)श्री. एच.आर. पाटील (माजी सभापती खालापूर पंचायत समिती)श्री. निखील… Read more: कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .