अत्यावश्यक सेवेतील लोकांना आता लोकल मधून प्रवासासाठी घ्यावा लागणार युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास..!

| मुंबई | बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र लिहिलं आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी आता राज्य सरकारची परवानगी लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास देण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकलमधून होणारी घुसखोरी टाळण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सध्या मध्य रेल्वेतून 18 लाख प्रवासी प्रवास करत आहेत तर पश्चिम रेल्वेमधून 11 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. यापैकी जवळपास पन्नास टक्के प्रवासी बनावट आय कार्ड बनवून रेल्वे तिकीट मिळवत असल्याचा संशय आहे.

त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास घेणे बंधनकारक राहणार आहे.

डेल्टा प्लस व्हायरसचा धोका आणि तिसरी लाट थोपवण्यासाठी लोकलमध्ये गर्दी कमी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.

कसा मिळवायचा हा पास
अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास मिळवण्यासाठी खालील साईटवर जाऊन आपला मोबाईल नंबरवरुन ओटीपी मिळवून विचारलेली माहिती भरायची आहे.

https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm?_qc=3b5dc24c5639dd4331a6cf6491f2386f

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *