| विकास गंगा | हे तीन मोठे प्रकल्प करणार कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, नवी मुंबई चा प्रवास अजून वेगवान..!

ठळक मुद्दे :

✓ हे तीन मोठे प्रकल्प करणार कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथकरांचा प्रवास वेगवान……

✓ कल्याणफाटा येथील कल्याणफाटा-महापे उड्डाण पूल फक्त ३ लेनचा न करता तो ४ लेन करावा ! – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना.

✓ ऐरोली काटई एलिव्हेटेड प्रकल्पातल्या अडचणी दूर.

✓ शिळफाटा येथे लवकरच उड्डाणपुलाचे तर कल्याणफाटा येथे अंडरपास व उड्डाणपुलाच्या कामास ऑक्टोबर पासून सुरवात.

| मुंबई | आज नगरविकासमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, एम. एम. आर. डी. ए. आयुक्त श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघात एम. एम. आर. डी. ए.च्या अंतर्गत सुरु असलेल्या कामांबाबत बैठक घेण्यात आली. ऐरोली काटई मार्गातल्या दुसऱ्या बोगद्याचे काम वेगात सुरु असून ऐरोली बाजूस असलेल्या बोगदातल्या मार्गात “विजेच्या टॉवर” (ट्रान्समिशन टॉवरमुळे) कामांमध्ये अनेक अडचणी सामोरे जावे लागत होते. आज बैठकीत सदर टॉवर दुसऱ्या जागी हलवण्यासाठी वनविभागाने मंजुरी दर्शवली असून टॉवरची पर्यायी जागा वनविभागातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. ह्या एलिव्हेटेड प्रकल्पामुळे नवीमुंबई आणि कल्याण-डोंबिवली हि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. ह्या नवीन मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असून ऐरोली ते काटई हे अंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. “ऐरोली ते मुंब्रा येथील व्हायजंक्शन पर्यंतचा टप्पा पुढील वर्षात वापरासाठी खुला होईल” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

कल्याण फाटा व शिळफाटा येथे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी ह्यासाठी कल्याण शिळफाटा येथे उड्डाणपूल व कल्याणफाटा येथे अंडरपास आणि ओव्हरब्रिजचे काम ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु करण्यात येईल. कल्याण फाटा येथे “Grade Separation” ह्या प्रणाली द्वारे मुंब्रा बायपास येथून येणारी वाहतूक अंडरपास द्वारे तळोजा-पनवेल मार्गाकडे जाण्यास मदत होईल व डोंबिवली-नवीमुंबई वाहतुकीसाठी कल्याणफाटा येथेच उड्डाणपुलाच्या उभारणी करण्यात येणार आहे. कल्याणफाटा येथील उड्डाणपुलासाठी शिळफाटा-महापे मार्गातल्या एम. आय. डी. सी. च्या पाईपलाईन पर्यायी जागी स्थलांतरित करणे गरजेचे होते परंतु पाईपलाईन स्थलांतरित करणे अतिशय खर्चिक असल्या कारणाने कल्याण फाटा येथील उड्डाणपुलाचे अलाईंगमेंट बदलण्यात येणार आहे व हा उड्डाणपूल महापे येथील एम.आय.डी.सी. ची पाईपलाईन ओलांडून महापे-शिळफाटा मार्गावरच उतरवण्यात येईल.

सुमारे ९० कोटीचा हा उड्डाण पूल फक्त ३ लेनचा न करता तो ४ लेन करावा अश्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या व ४ लेन साठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास एम.एम. आर. डी. ए. च्या आयुक्तांनी संमती दर्शवली आहे. व ४ लेन उड्डाणपुलाच्या कल्याणफाटा येथील वाढीव जमीन अधिग्रहणाबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी बैठकीत सांगितले. पत्रीपूल व दुर्गा किल्ल्याजवळील खाडीपुलाच्या उभारणी नंतर निळजे येथील उड्डाणपुलाचे कामसुद्धा प्रगतीपथावर येणार आहे.

मतदारसंघात खासदार डॉ श्रीकांत शिंदे सातत्याने विकासकामांचा प्रत्यक्ष पाठपुरावा करताना दिसत आहेत. पत्री पूल, कोपर पूल आदी त्याची नुकतीच पूर्णत्वास गेलेली उदाहरण आहेतच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *