‘ साधूंचे मारेकरी , भाजपचे पदाधिकारी ‘ काँग्रेसची सोशल मीडियावर मोहीम..!| मुंबई | लॉकडाऊन कालावधीत पालघरच्या गंडचिंचले गावात एका अफवेवरुन तीन जणांची सामूहिक हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आतापर्यंत १०१ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी हे भाजपचेच पदाधिकारी असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत या साधूंचे मारेकरी भाजपचे पदाधिकारी असल्याचं म्हटलंय. तसेच त्यांनी यासंबंधित काही पुरावे सादर केले आहेत. साधुंच्या लिंचिंगचे आरोपी क्र. ६१ ईश्वर निकुले आणि ६५ भाऊ साठे हे भाजपचे पदाधिकारी आहेत, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये भाजप बूथ प्रमुखांची नावे असणारी यादी देखील प्रसिद्ध केली आहे. आरोपींच्या यादीत आणखी बरेच भाजप कार्यकर्ते आहेत. तसेच अटक झालेल्यांच्या यादीत भाजपच्या बूथ प्रमुखांचीही नावे असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

दरम्यान, साधूंच्या हत्येत सहभागी असलेल्या त्यांच्या पक्षाच्या सदस्यांवर भाजपकडून कारवाई का केली जात नाही?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. यावरूनच महाराष्ट्र काँग्रेसने ‘ साधूंचे मारेकरी , भाजपचे पदाधिकारी ‘ अशी मोहीम देखील राबवली आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *