सलाम : नवी मुंबई महापालिकेतील शिक्षकांनी रचला नवा पायंडा..!

| नवी मुंबई | कोरोना महामारीच्या काळात सर्वच स्तरातून पंतप्रधान , मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात दानशूर व्यक्ती मदतनिधी जमा करत आहेत. सामाजिक भान जपत आपला खारीचा वाटा अनेक संस्था, व्यक्ती यांच्याकडून शासनापर्यंत पोहचत आहे.  अश्याच प्रकारे राज्य प्राथमिक शिक्षक संघ, नवी मुंबई यांच्याकडून नवी मुंबई महानगरपालिकेला कोव्हीड-१९ साठी रूपये तब्बल २,७९,२२१/- किंमतीच्या वैद्यकिय साहित्याची मदत करण्यात आली आहे. सदरच्या साहित्यामध्ये पी.पी.ई. किट-१५०, मास्क-१२५, ब्लँकेट-७४१ याचा समावेश आहे.  यासाठी संघटनेने उत्स्फूर्तपणे नवी मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांनी वर्गणी काढून लढा निधी जमा केला होता.

या नावीन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमाबाबत नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, नवी मुंबई यांचे कौतुक केले. याशिवाय कोव्हीड-१९ निमित्त शिक्षकांनी जबाबदारीपूर्ण केलेल्या विविध कामाबद्दल गौरवास्पद उदगार काढले आहेत. मदतनिधी साहित्य महापालिका उपायुक्त श्री नितीन काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी विस्तार अधिकारी श्रीम. रूतिका संखे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नवी मुंबई चे अध्यक्ष श्री सांगरनाथ भंडारी, राज्य चिटणीस श्री संजय मोरे, खजिनदार खुशाल चौधरी तसेच सरचिटणीस आत्माराम आग्रे हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया..!
कर्मचाऱ्यांना सर्वाधिक सानुग्रह अनुदान देणारी मनपा म्हणून आमची नवी मुंबई मनपा प्रसिद्ध आहे. नवी मुंबई क्षेत्रातील सामाजिक व शैक्षणिक संस्था हे महापालिकेला भरीव मदत करत असताना आमच्या संघटनेचे मार्गदर्शक सन्मा. अनंतजी सुतार साहेब, तसेच शिक्षणातील जाणते नेतृत्व मा. सुधाकरजी सोनवणे साहेब यांनी संघटनेच्या मार्फत मदतनिधी जमा करण्याची कल्पना आमच्यासमोर मांडली. त्या अनुषंगाने आम्ही केलेल्या आवाहनाला महापालिकेचे उत्तरदायित्व म्हणून बहुसंख्य कार्यरत शिक्षक/मुख्याध्यापक तसेच सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक यांनी भरघोस मदत केली. तसेच मा. उपायुक्त नितीनजी काळे साहेब यांनी उपयोगी साहित्याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच आमचे कुटुंब प्रमुख मा.आयुक्त अण्णासाहेब मिसाळ साहेब यांनीही शिक्षक कोव्हीड-19 निमित्त करत असलेल्या विविध कामांबद्दल कौतुक केले. या सर्वांचे मी संघटनेच्या वतीने आभार मानतो..
– सागरनाथ भंडारी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, नवी मुंबई.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *