संत तुकाराम – ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरपूरला रवाना

| पुणे | संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका वेगवेगळ्या बसने पंढरपूरकडे रवाना झाल्या. या बसमध्ये फक्त २० – २० लोक आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूवरुन तर ज्ञानेश्वरांच्या आळंदीवरुन पंढरपूरकडे निघाल्या.

या दरम्यान भक्त्यांनी दोन्ही बसला फुलांनी सजवले होते. बसमधील सर्व व्यक्तींनी तोंडाला मास्क लावलेहोते. पुण्यावरुन निघालेल्या या बस आता थेट पंढरपूरला थांबतील. याआधी पादुकांना हेलीकॉप्टरने पंढरपूरला नेण्याची तयारी होती. या दोन्ही संतांशिवाय संत सोपानदेव, चांगावटेश्वर देवस्थानच्या पादुकाही आज संध्याकाळपर्यंत पंढरपूरला पोहचतील. पुण्याचे कलेक्टर नवल किशोर राम यांनी आळंदीवरुन बस निघण्यापूर्वी तुकाराम महाराजांची पुजा केली.

सोलापूर पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूरमध्ये कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरवर्षी लाखो भाविक आषाढीला पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात. सोलापूरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल जेंडेर यांनी सांगितले की, बाहेरील लोक आत येऊ नये, यासाठी आम्ही नाकाबंदी केली आहे. गर्दी होऊ नये यासाठी शहरात कर्फ्यू लावण्याचा विचारही करत आहोत. पंढरपुरमध्ये ३० जून- ३ जुलैपर्यंत कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव सोलापूरच्या कलेक्टरला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *