ठाणे जि. प. मध्ये लवकरच विज्ञान पदवीधर, केंद्रप्रमुख नियुक्त्या होणार, पदवीधर कृती समितीला उपाध्यक्षांचे आश्वासन..!

| ठाणे | महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद विज्ञान पदवीधर कृती समिती ठाणे जिल्हा व राज्य कार्यकारीणी सदस्य शिष्टमंडळाने पदवीधरांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांची मुरबाड येथे भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने RTE नुसार विज्ञान पदवीधर शिक्षक आणि केंद्रप्रमुख नियुक्ती करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, असा आग्रह संघटनेने धरला असल्याची माहिती ठाणे जिल्हाध्यक्ष उमेश बेंडाळे यांनी दिली.

आज मितीस ठाणे जिल्ह्यात एकूण ११२ बी.एस.सी. बी. एड व बी.एस.सी. पदवी धारक आहेत. त्यांची पदवीधर नियुक्ती होणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. दरम्यान असे केल्यास विकल्प विपरीत पालघर जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांना ठाणे जिल्ह्यात परत आणण्यासाठी जागा रिक्त होतील, त्यामुळे तो विकल्प बाधितांचा प्रश्न देखील सुटेल याकडे देखील संघटनेने लक्ष वेधले असून बदली प्रक्रियेपूर्वी पदोन्नती प्रक्रिया राबविल्यास विज्ञान पदवीधर शिक्षकांना योग्य न्याय मिळेल ही ठोस भूमिका यावेळी मांडली.

याबाबतीत उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्वतः लक्ष घालून बदलीपूर्वी पदोन्नती प्रक्रिया राबविण्यासाठी आग्रही भूमिका घेण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या भेटीवेळी कृती समितीचे राज्य अध्यक्ष वसंत पडवळ ,सचिव सुभाष पाटील, ठाणे जिल्हा अध्यक्ष उमेश बेंडाळे ,सचिव शैलेष इसामे आणि इतर १५ सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *