गंभीर : रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे दिल्लीहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल..!
मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन मुळे मिळाला दिलासा..!

| मुंबई & नवी दिल्ली | लॉकडाऊन झाल्यापासून दिल्लीत युपीएससीची तयारी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी रेल्वेने काल घरी पोहचले..  या सर्वांना महाराष्ट्रात आणण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले होते. अगदी लॉक डाऊन पासून दिल्लीत त्यांची जेवणाची व्यवस्था देखील केली होती. परंतु परतीच्या प्रवासात रेल्वे आणि स्थानिक प्रशासन यांच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.. या प्रवासात त्यांचे हाल बेहाल झाल्यांच्या प्रतिक्रिया प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत. 

संपूर्ण माहिती अशी की, जी विशेष ट्रेन रेल्वेने दिली होती त्या ट्रेनचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासनाने उचललेला असूनही प्रवासात अत्यंत गैरसोयीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. स्लिपरचे अनेक डबे रिकामे असतानाही जनरलच्या डब्यात अक्षरशः विद्यार्थ्यांना कोंबण्यात आले होते. एका सीटवर ४ ते ५ विद्यार्थ्यांना बसविण्याची व्यवस्था करून सोशल डिस्टन्सिंग चे नियम पायदळी तुडविण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. तसेच ना पिण्यासाठी पाणी ना शौचालयात पाण्याची व्यवस्था होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी खाली झोपून रात्र काढल्याचे समजले आहे.

रेल्वेस्टेशन वर ही या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. स्क्रिनिंग साठी सकाळी दहा वाजता सर्व विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. स्क्रिनिंग मात्र सायंकाळी ५ वाजता सुरू झाले आणि दिवसभरात विद्यार्थ्यांनची कोणत्याही प्रकारची जेवण्याची व्यवस्था करण्यात न आल्यामुळे दिवसभर उपाशीचं विद्यार्थ्यांना रहावे लागले. वरून कहर म्हणजे जी ट्रेन आठ वाजता निघणार होती ती सव्वा दहा वाजता म्हणजे तब्बल दोन तास उशिराने..

दरम्यान , डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून नाश्तासाठीचे जे कीट रेल्वेत दिले होते तेच विद्यार्थ्यांच्या मदतीला आले, त्यात भुसावळ आणि कल्याण इथे डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून जेवणाची देखील सोय या विद्यार्थ्यांची करण्यात आली होती. परंतु रेल्वेने कोणतीही सोय या त्याच प्रशासनाचा भाग बनणाऱ्या विद्यार्थ्यांची केली नव्हती.. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. त्याच वेळी निरपेक्ष मदत करणाऱ्या खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना आणि महाराष्ट्र शासनाला मात्र त्यांनी धन्यवाद दिले आहेत.

परंतु या मुळे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत.  महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांचा सर्व खर्च उचलुनही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसोबत हा दुजाभाव का..? अशा प्रकारची वागणूक विद्यार्थ्यांना रेल्वेकडून का मिळाली नाही..? सर्वपक्षीय खासदार आणि पक्ष प्रतिनिधी याच्या विरोधात निषेध नोंदवतील का..? आणि रेल्वेला प्रश्न विचारून मराठी अस्मिता जोपासतील का? 

या सर्व चीड आणणाऱ्या वागणुकीबद्दल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी निषेध नोंदवला असून असा ढिसाळ कारभार इथून पुढे होणार नाही, यासाठी खबरदारी घ्यावी असे देखील सुचविले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *