
| मुंबई | कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली. कोरोनाच्या संकटावर मात कशी करायची आणि कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली. तसेच पुढील कालावधीत लॉकडाऊन ठेवायचे की नाही, याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये ही बैठक झाली. बैठकीला जयंत पाटील, संजय राऊत, राज्याचे सचिव अजोय मेहता उपस्थित होते.राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाची साखळी वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोनावरुन विरोधकांकडून राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधा-यांकडून करण्यात आला आहे. कोरोनाची स्थिती दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात बैठक झाली. कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालल्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ते काय मार्गदर्शन करतात, याचीही उत्सुकता आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईची लोकल चालू करण्याबाबत देखील चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार