पुण्यालगतच्या गावांमध्ये वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सेक्टर प्रमुख ही संकल्पना..!

| पुणे | पुणे शहरालगतच्या २३ गावांमध्येही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी तिथं आता प्रत्येक ५० कुटुंबांमागं एक सेक्टरप्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेक्टर प्रमुखाच्या माध्यमातूनच तिथल्या कोरोना साथीचं निर्मूलन केलं जाणार आहे.

पुण्यालगतची २३ गावांमध्येही कोरोनाचा उद्रेक अधिकचा असून शहरालगतच्या हवेली तालुक्यात अँक्टिव्ह रूग्णांची संख्या ८५० च्यावर गेली आहे. तर एकूण पुणे ग्रामीण भागातील रूग्णसंख्या ४ हजारांवर गेली असून १०० रुग्ण दगावले आहेत.

पुणे शहरात तर कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. पण मनपा हद्दीलगतची २३ गावं देखील कोरोनाबाधीत बनली आहेत. कारण या गावांमधील बहुतांश लोक हे नोकरी धंद्यानिमित्त पुणे शहरात येजा करतात. म्हणूनच २३ गावांमधील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी या गावांमध्ये लॉकडाऊन काळात सगळीकडे फवारणी केली जात आहे. तसंच घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण केलं जात आहे. तसंच या शहरालगतच्या गावांमधून झेडपी सीईओ आयुष प्रसाद यांनी प्रत्येक ५० कुटुंबांमागे एक सेक्टर प्रमुख नियुक्त करण्याचे निर्देश दिलेत, अशी माहिती पुणे झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

दरम्यान, नऱ्हेसारख्या गावांमध्ये एकाचवेळी प्रांत आणि पुणे पोलिस अशा दोन्ही यंत्रणांकडून भिन्न स्वरूपाचे आदेश पारित केले गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तसंच सततच्या सीलबंद लॉकडाऊनला नोकरदारही वैतागले आहेत.

पुणे शहरालगतच्या या २३ गावांमध्ये यापूर्वीच सीलबंदचे आदेश जारी झाले आहे. तरीही कोरोनाचा फैलाव काही केल्या थांबत नाही आहे. झेडपी सीईओंची ही सेक्टर प्रमुखाची संकल्पना तरी फायद्याची ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *