ही सोपी क्रिया आहे कोरोना वरील रामबाण उपाय, पुण्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांचा दावा..!

| पुणे | जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणू संसर्गावर लस विकसित करण्यासाठी अहोरात्र प्रचंड मेहनत घेत आहे. ही लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. अशातच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी ‘जलनेती’ हा उपाय वापरुन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो, असा दावा केला आहे. मागील तीन महिन्यांपासून सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा रुग्णालयातील कर्मचारी ही जलनेती करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

गेले तीन महिन्यांपासून सगळे जग कोरोना व्हायरसमुळे चिंतेत आहे. कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी अनेक देश औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. औषधांच्या मानवावर प्रयोग देखील सुरू झाले आहेत परंतु, अद्याप तरी त्यांच्या या प्रयत्नाला यश आले नाही. परंतु, असे असले तरी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी मात्र ‘जलनेती’ उपाय कोरोनावर परिणामकारक असल्याचा ठोस दावा त्यांनी केलाय. दीनानाथ रुग्णालयातील कोरोना रुग्णाची देखभाल करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि सफाई कर्मचारी सध्या जलनेती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेले तीन महिन्यांपासून सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा येथील कर्मचारी ही जलनेती करतात. त्यामुळे येथील जलनेती करणारा एकही डॉक्टर अथवा रुग्णालयातील इतर कर्मचारी अजूनपर्यंत कोरोना बाधित झाले नाहीत, असा दावाही डॉक्टर केळकर यांनी केला आहे.

जलनेती क्रिया :
ही जलनेती करण्यासाठी फक्त ३० ते ४० सेकंद इतका वेळ लागतो. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. यात खाली मान करुन एका नाकपुडीतील कोमट पाणी ओतून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढायचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *