हे आहेत आजच्या पंतप्रधान यांच्या सोबतच्या चर्चेतील महत्वाचे मुद्दे..!


  • महाराष्ट्राकडून पूल टेस्टिंग ही नवीन संकल्पना देशासमोर मांडण्यात आली.
  • तीन झोन मध्ये देशाची विभागणी.. रेड, ऑरेंज, ग्रीन विभागात विभागणी होणार

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून लॉकडाऊन वाढविण्याबाबत स्पष्ट सांगितले आहे. आता ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री यांच्या संवादा नंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत बरेच मुद्दे सांगितले..

महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :- 

१. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे PPE, मास्क मुबलक प्रमाणात देण्याची मागणी केली आहे.
२. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर पूल टेस्टिंग संकल्पना राज्याच्यावतीने मांडली. अमेरिकेतील महाराष्ट्राच्या डॉक्टरांनी त्यांचा अभ्यास करून हे मांडलं आहे. यासाठी केंद्राने आपल्या राज्याला परवानगी द्यावी. आपले स्वॅब नमुने घेतले जातात, यात वेळ जातो. एकत्र स्वॅब नमुने घेतल्यास सगळ्यांची टेस्ट घेणं सहज शक्य आणि अहवाल निगेटीव्ह आला तर फायदा होतो.
३. ग्रीन भागत काही नाही तिथे बॉर्डर सील करुन काही मार्गदर्शक सूचना देता येतील. या ग्रीन भागात सोशल डिस्टन्सिंग ठेऊन काम झाल्यास कंपन्या सुरु करता येतील.
४. संपूर्ण देशात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन राहतील. १५ अधिक केस रेड, १५ पेक्षा कमी ऑरेंज, ग्रीन म्हणजे केस नाही. याबाबत गाईडलाईन १-२ दिवसात सांगितली जाईल.
५. देशात ज्या पद्धतीने संख्या वाढते आहे ते लक्षात घेता पूर्ण देशात एकच निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे पूर्ण देशासाठी लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात विचार करण्यात आला आहे. कारण लॉकडाऊन संदर्भात वेगवेगळे निर्णय घेता येत नाही. काटेकोर लॉकडाऊन पाळल्यानंतरच येणाऱ्या काळात कोरोनावर मात करता येणार नाही.
६. लॉकडाऊनच्या काळात लोकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व्हावा त्यासाठी स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. तसे आदेश देण्यात आले आहेत. पुरेशी यंत्रणा आणि साधन सामुग्री सरकारकडे उपलब्ध आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.