| नवी दिल्ली | जगात गुगल हे सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक हव्या त्या गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र आता गुगलने एक खास फीचर आणलं आहे. गुगलकडून Verified Calls फीचरची घोषणा करण्यात आली आहे. Google Phone अॅप्सचा हा एक भाग आहे. यामुळे तुम्हाला कोण कॉल करतंय याबाबतची माहिती मिळणार आहे.
कॉल फ्रॉड्सवर लगाम लावणं हा गुगलच्या या खास फीचरमागचा मुख्य उद्देश आहे. भारतासह जगभरात फ्रॉड कॉल्स ही मोठी समस्या आहे. तसेच Verified Calls फीचर रोल आउट करण्यासोबतच युजर्सचा यापासून बचाव होणार आहे. बिझनेस कॉलमध्ये युजर्सला कोण आणि का कॉल करत आहे हे दिसणार आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्पेन, ब्राझील, मेक्सिको आणि यूएससह जगभरात हे फीचर रोलआऊट केले जात आहे.
बिझनेस कॉल करण्यामागचं कारण सुद्धा सांगणार
सध्या TrueCaller हे अॅप युजर्सना असे फंक्शन देत आहे. Google Phone अॅपमध्ये हे फीचर्स आल्यास हे फीचर युजर्सच्या डिव्हाईसचा एक भाग बनणार आहे. म्हणजेच वेगळं कोणतंही अॅप यासाठी खास डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. Verified Calls ही TrueCaller अॅपसारखं काम करणार आहे.
एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने दिलेल्या माहितीनुसार, पायलट प्रोग्रॅमच्या सुरुवातीला रिझल्ट्स खूप चांगले राहिले आहे. युजर्संना याचा फायदा नक्की मिळेल.
गुगलच्या पिक्सल सीरीज शिवाय खूप अँड्रॉईड फोन्समध्ये डिफॉल्ट Google Phone अॅप हेच डायलरचे काम करीत असतात. या सर्व फोन्समध्ये नवीन फीचर अपडेटसोबत मिळेल. जर फोनमध्ये Google Phone अॅप इन्स्टॉल नसेल तर गुगल प्ले स्टोरवरून ते इंस्टॉल करता येते. गुगलचे हे नवीन फीचर्स युजर्संना बिझनेस कॉल करण्यामागचं कारण सुद्धा सांगणार आहे. TrueCaller मध्ये हे फीचर अद्याप उपलब्ध नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .