| मालेगाव | मालेगाव हे महाराष्ट्रातील कोरोनाची झपाट्याने वाढ होणारे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे मालेगावचे महापालिका आयुक्त, सहायक आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री दादा भुसे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आढावा बैठकीत आयुक्तही हजर होते. याच वेळी कोरोना चाचणीचा एक अहवाल आरोग्य विभागाकडे आला. त्यात महापालिका आयुक्तांसह पालिकेच्या इतर दोघांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले.
आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीतच आयुक्तांना दिली. त्यामुळे आयुक्त तत्काळ बैठकीतून बाहेर गेले. स्वॅब दिलेला असतानाही क्वॉरंटाइन होण्याऐवजी आयुक्त बैठकीला उपस्थित कसे होते, असा प्रश्न विचारला जात आहे. मंगळवारी जिल्ह्यात ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात जालन्यातील ६ जणांसह ८ जवान, स्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर व १८ पोलिसांचा समावेश आहे.
एकंदरित, शहर प्रशासनाचे प्रमुखच कोरोना मुळे बाधीत झाले असल्याने मालेगावच्या चिंतेत अजून भर पडली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा