मंत्र्यांसोबत बैठक चालू असतानाच आला रिपोर्ट नि आयुक्त निघाले संक्रमित..!

| मालेगाव | मालेगाव हे महाराष्ट्रातील कोरोनाची झपाट्याने वाढ होणारे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे मालेगावचे महापालिका आयुक्त, सहायक आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री दादा भुसे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आढावा बैठकीत आयुक्तही हजर होते. याच वेळी कोरोना चाचणीचा एक अहवाल आरोग्य विभागाकडे आला. त्यात महापालिका आयुक्तांसह पालिकेच्या इतर दोघांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. 

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीतच आयुक्तांना दिली. त्यामुळे आयुक्त तत्काळ बैठकीतून बाहेर गेले. स्वॅब दिलेला असतानाही क्वॉरंटाइन होण्याऐवजी आयुक्त बैठकीला उपस्थित कसे होते, असा प्रश्न विचारला जात आहे. मंगळवारी जिल्ह्यात ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात जालन्यातील ६ जणांसह ८ जवान, स्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर व १८ पोलिसांचा समावेश आहे.

एकंदरित, शहर प्रशासनाचे प्रमुखच कोरोना मुळे बाधीत झाले असल्याने मालेगावच्या चिंतेत अजून भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *