कोण होणार राज्यपाल नियुक्त आमदार, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत शिफारसी होण्याची शक्यता..!
पावसाळी अधिवेशन कधी होणार यावरही शिक्कमोर्तब होण्याची शक्यता..!

| मुंबई | महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाचा निर्णय मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. तसेच याच दिवशी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांच्या शिफारशींच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार आहे.(governor nominated mla)

२२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत नियोजित होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यासंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे. मंगळवारी (९ जून) रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पावसाळी अधिवेशन कसे घ्यायचे याचा निर्णय होईल. दरम्यान पूर्वनियोजित तारखांना अधिवेशन होईल, मात्र ते अल्प कालावधीचे होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

विधान परिषदेवर पाठवायच्या राज्यपाल नामनिुयक्त आमदारांच्या १२ जागा सध्या रिक्त आहेत. त्यांच्या शिफारशींचा निर्णयसुद्धा मंगळवारीच होणार आहे. या दिवशी मंत्रिमंडळ बैठक बोलावली असून त्यात या १२ रिक्त जागांच्या शिफारशींचा प्रस्ताव संमत केला जाणार आहे. यापूर्वी शिफारस करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डावलली होती. त्यामुळे या वेळी त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.(governor nominated mla)

काय आहे तपशील :

  • विधान परिषदेच्या ८ जागांची मुदत संपलेली आहे. २ जागा राजीनाम्यामुळे रिक्त आहेत. १५ जूनला २ आमदारांची मुदत संपते आहे. अशा १२ जागा रिक्त होत आहेत.
  • रिक्त १२ जागांची वाटणी सत्ताधारी तिन्ही पक्षांनी केली आहे. शिवसेना ४, राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेसला ४ जागा मिळणार आहेत.
  • घटनेच्या १७१ (५) कलमानुसार वाङ्मय, विज्ञान, कला, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची राज्यपाल मंत्रिमंडळाच्या शिफारशीने नियुक्ती करतात.
  • राज्यपाल नियुक्तच्या सरकारच्या दोन शिफारशी राज्यपाल यांनी यापूर्वी डावलल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार कोणाची शिफारस करते याविषयी उत्सुकता आहे.(governor nominated mla)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *