
| नवी दिल्ली | वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, सलामीवीर शिखर धवन, महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा तसेच शिखा पांडे यांची शिफारस यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी होऊ शकते. मे अखेर बीसीसीआयला क्रिकेटपटूंची नावे पाठवायची आहेत. बुमराहने गेली चार वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली. याआधी २०१८ ला रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि धवनच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, मात्र पुरस्कार जडेजाला मिळाला.
बुमराहने १४ कसोटी सामन्यात ६८ आणि ६४ वन डेत १०४ गडी बाद केले आहेत. ५० टी-२० सामन्यात त्याच्या नावावर ५९ बळींची नोंद आहे. आयसीसी क्रमवारीत नंबर एक गोलंदाज बनला असून आॅस्ट्रेलिया, द.आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज येथे पाच-पाच गडी बाद करणारा तो एकमेव आशियाई गोलंदाज आहे.
बीसीसीआयकडूनन यंदा पुन्हा एकदा शमीच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता नाही. पत्नीसोबतचे त्याचे भांडण न्यायालयापर्यंत पोहोचले. याचा अर्थ तो पुरस्कारासाठी अयोग्य ठरतो. धवनबाबत सांगायचे तर त्याचे समकक्ष असलेले कोहली, अश्विन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि जडेजा यांना हा पुरस्कार मिळाला आहे. दुखापतीमुळे मागच्यावर्षी धवन बराचकाळ क्रिकेटपासून दूर राहलिा खरा मात्र सिनियर या नात्याने त्याच्याकडे डोळेझाक करता येणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. २०१८ लादेखील शिखरचे नाव पाठविले होते, मात्र महिला खेळाडू स्मृती मानधना हिला पुरस्कृत करण्यात आले.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही प्रक्रिया ऑनलाईन होणार असून अर्ज आणि इतर माहिती ऑनलाईन मागविण्यात आली आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .