| नवी दिल्ली | केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील पगारासंदर्भातील नवीन नियम लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार उद्योगातील कर्मचाऱ्यांचा घरी घेऊन जाण्याचा पगार कमी होण्याची शक्यता आहे.
एकूण पगारातील मूळ पगारापेक्षा इतर भत्ते 50 टक्क्यापेक्षा जास्त असू नयेत असे या नियमात म्हटले आहे. पगार संहिता 2019 मध्ये या नियमांचा समावेश असून या नियमाची अंमलबजावणी झाल्यास एप्रिलपासून कर्मचाऱ्याच्या प्रत्यक्ष घरी घेऊन जाण्याच्या पगारात घट होऊ शकते. मूळ पगारापेक्षा भत्ते 50 टक्क्यापेक्षा जास्त असू नये असा याचा अर्थ आहे. मूळ पगार किमान 50 टक्के असला पाहिजे असे सरकारला अपेक्षित आहे.
मूळ पगार किमान 50 टक्के असल्यानंतर कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युईटी आणि भविष्य निर्वाह निधीततील पेमेंट मध्ये वाढ होईल. त्यामुळे घरी घेऊन जाण्याचा कर्मचाऱ्यांचा पगार कमी होत असताना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम वाढेल.
सध्या बऱ्याच कंपन्या एकूण पगारात मूळ पगाराचा भाग 50 टक्क्यापेक्षा जास्त ठेवतात तर भत्त्याचा भाग 50 टक्क्यापेक्षा जास्त ठेवतात. मात्र नव्या नियमामुळे यात बदल होणार आहे. त्यामुळे कंपन्यांचे कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीतील योगदान वाढू शकते आणि कंपन्यांचा पगारा वरील खर्च 10 ते 12 टक्क्यांनी वाढू शकतो. हा कायदा संसदेने गेल्या वर्षी मंजूर केलेला आहे. या संदर्भातील नियम संबंधिताबरोबरच्या चर्चेनंतर जारी केले जाती. एप्रिल अगोदर ते जारी होण्याची शक्यता आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .