| मुंबई | सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करा, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वेला लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या पत्रावरील उत्तराची प्रतीक्षा आहे.
सकाळी ७.३० वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा वाजल्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी लोकल सुरु ठेवा. तर सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार हे अद्याप अस्पष्टच आहे. सरकारने सध्या फक्त शक्यतांवर प्रतिसाद मागितला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लोकल गाड्या बंद करण्यात आल्या. ७ महिन्यानंतर अखेर आता लोकल महिला, वकील आणि सुरक्षा रक्षक तसेच कामगारांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच आता लवकरच सर्व प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत.
राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत खासगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार आणि सर्वच प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत चर्चा झाली होती. महिलांना ज्याप्रकारे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली त्याच धर्तीवर अन्य प्रवाशांना परवानगी देता येईल का?, त्यात वेळेचे बंधन घालावे का? याविषयी बैठकीत चर्चा झाली. खासगी क्षेत्रात काम करणा-या नोकरदारांची संख्या मोठी आहे. त्याअनुषंगाने लोकल सेवेवर किती ताण येऊ शकतो, याचाही विचार केला गेला. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यात येऊ शकते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .