अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी – आ. बबनराव शिंदे

| टेंभुर्णी / महेश देशमुख | माढा मतदारसंघातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देणेबाबत आमदार बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली आहे.

माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या कालच्या प्रचंड वादळी वारा व पाऊस यामुळे हजारो एकर ऊस, केळीच्या बागा, डाळींब व फळबागा भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ओढे, नाले भरून शेती वाहून गेलेली आहे तसेच अनेकांचे घरामध्ये पाणी शिरून अतोनात नुकसान झालेले आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला असून आता अस्मानी संकटामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.

अतिवृष्टीमुळे माढा मतदारसंघातील पंढरपूर, माळशिसर,माढा भागातील शेतकऱ्यांचे शेतीचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान तसेच भिमा नदीकाठावरील व सिना नदीकाठावरील गावे महापुराने बाधित होवून त्या ठिकाणचे घरांची झालेली पडझड, दगावलेली अथवा पुरामध्ये वाहून गेलेली असंख्य जनावरे असतील अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे, गोरगरींबाचे तातडीने पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळणेसाठी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर तसेच प्रांताधिकारी व तहसिलदार यांना फोनवरून व पत्राद्वारे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करणेबाबत सुचना देणेत आल्या आहेत अशी माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

✓ सूचना देऊन तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे. बाधीत शेतकऱ्यांनी,नागरिकांनी पंचनामे करून घ्यावेत काही अडचण आल्यास माझेशी फोनवर संपर्क साधावा:- आ. बबनदादा शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *