| कल्याण | ठाणे शहर आणि जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोविडग्रस्त शिवसैनिकांना धीर देण्यासाठी पालकमंत्री श्री एकनाथ शिंदेनंतर आता कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील कोविड वार्ड मध्ये जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
वंदनीय बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक आणि कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर श्री राजेंद्र देवळेकर यांच्यावर निऑन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी श्री देवळेकर यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि धीर दिला. ” तमाम शिवसैनिकांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि मोठ्या साहेबांनी देखील आपली चौकशी केलीय. आपले बंड्या साळवी देखील आता बरे झालेत. तुम्हीही काही काळजी करू नका. तुम्हीसुद्धा लवकर बरे होणार आहात. माझं डॉक्टरांशी बोलणं सुरू आहे. काहीही अडचण वाटली तर मला कधीही फोन करा “. खासदार डॉ शिंदे यांच्या या धीर देणाऱ्या शब्दांनी श्री देवळेकर यांस गहिवरून आले.
गेल्याच आठवड्यात ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे PPE किट घालून कोविडग्रस्त वार्डात शिवसैनिक बंड्या साळवी यांस भेटायला गेले होते. कोरोनाच्या संकट काळात शिंदे पिता पुत्रांच्या माध्यमातून रुगणसेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू आहे. नुकतेच महाड येथील झालेल्या दुर्घटनेत वाचलेल्या 2 चिमुकल्यांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनने दत्तक घेतले आहे. शिंदे पिता – पुत्रांची संवेदनशीलता ठाण्यासह राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .