आपल्या माणसांची दिवाळी : शंभर कुटूंबाना एक महिना पुरेल एवढे धान्य व किराणा साहित्य देऊन पालघरच्या आदिवासी बांधवांच्या मदतीला सरसावली समाजभान टीम..!

| पालघर – मोखाडा | पालघर जिल्ह्यातील माखोडा येथील राहणाऱ्या आदिवासी बांधवावर काही दिवसांपासून उपासमारीची व आत्महत्येची वेळ आली होती. ही बाब नाशिक येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे यांच्या माध्यमातून समाजभान टीम जालना यांना समजताच समाजभानने तत्परता दाखवत जालना जिल्ह्यातील अंबड येथून या अदिवासी कुटूंबियाकरिता एक महिना पुरेल एवढे धान्य, किराणा साहित्य व महिलांना साड्याचे वाटप केले.

लॉकडाऊन दरम्यान या गाव व परिसरातील जवळपास ४००० युवकानी स्थलांतर केले असल्यामुळे त्यांच्या कुटूंबातील महिला व मुलांच्या पोटाचा प्रश्न उभा राहिला होता. हाताला काम नसल्यामुळे, डोंगर दऱ्यात राहणाऱ्या या आदिवासी बांधवावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांच्यावर आलेल्या उपासमारीच्या या संकटात त्यांच्या पोटाला अन्न मिळावे म्हणून जालना येथील समाजभान संस्थेने समाजातील दातृत्वाच्या मदतीने जवळपास सव्वा दोन टन अन्न साहित्य जमा करून या आदिवासी बांधवांची भूक भागवली.

या मोहिमेकरिता समाजभानचे अशोक शहा, जालना येथील नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांनी मोलाचे सहकार्य केले. या मदत मोहिमेसाठी समाजभानचे दादासाहेब थेटे, शिवाजी बजाज, संदीप सातपुते, अशोक शिंदे, गणेश मिरकड, माधव नागरे, दत्ता शिनगारे, सुभाष काळे, यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी ठाणे येथील एक्का फौंडेशनचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील, सचिव प्रवीण काळे, आधार सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे, इडियट ट्रेकर्स ग्रुपचे प्रवर्तक प्रवीण शिंदे, विजय गिरासे, पिंटु बुचुडे यांची उपस्थिती होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *